AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात मिनी लॉकडाऊन, दहावी-बारावी, MPSC परीक्षांचं काय?

Pune Corona lockdown update : पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील.

पुण्यात मिनी लॉकडाऊन, दहावी-बारावी, MPSC परीक्षांचं काय?
दहावीची परीक्षा रद्द
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 02, 2021 | 2:08 PM
Share

पुणे : पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट (Pune Corona lockdown update) होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील. तसेच दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. (Pune Corona lockdown update : SSC, HSC, MPSC exams will be held at the scheduled time)

याबाबत सौरभ राव म्हणाले, “परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील”. बेडची संख्या वाढवणार,टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.

10 वी, 12 वी, MPSC च्या परीक्षांचं काय?

सौरभ राव यांनी सांगितले की, दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. त्यात कोणताही बदल केला जाणार आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असेही राव यांनी यावेळी स्पष्ट केले. व्यायामशाळा सुरु राहतील. पुण्यात दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील सध्यस्थिती

– पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम – पुढील आठवड्यापर्यंत भयावह परिस्थिती – पुन्हा एकदा पुण्यात बेडची कमतरता जाणवणार – जिल्ह्यात मृत्युदरही वाढण्याची शक्यता – आठवड्याची परिस्थिती पाहता निर्बंध कडक लागण्याची शक्यता – बैठकीत लॉकडाऊन नकोचा सूर पण कडक निर्बंध लावण्याची मागणी

2 एप्रिल 2022

पुणे जिल्ह्याची बेड स्थिती

एकूण बेड्सची स्थिती – ऑक्सिजन बेड्स – 9118 – ऑक्सिजन विरहीत बेड्स – 41093 – आयसीयु बेड्स – 2927 – व्हेंटिलेटर्स बेड – 996

उपचार बेडची स्थिती ऑक्सिजन बेडवर उपचार संख्या – 2974 ऑक्सिजन विरहीत बेडवर उपचार संख्या – 11563 आयसीयु बेडवर उपचार संख्या – 1073 व्हेंटिलेटर्स बेडवर उपचार संख्या – 376

शिल्लक बेडची स्थिती – ऑक्सिजन बेड्स – 6144 – ऑक्सिजन विरहीत बेड्स – 29530 – आयसीयु बेड्स – 1854 – व्हेंटिलेटर्स बेड – 620

रुग्ण संख्येची स्थिती – ऍक्टिव्ह रुग्ण – 61740 – रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या – 15986 ( यामधील गंभीर रुग्ण 4423 ) – घरी उपचार घेणारे रुग्ण – 45754

12 एप्रिल पर्यंतचा प्रशासकीय अनुमान – ऑक्सिजन विरहित फक्त 9 बेड्स शिल्लक राहतील – 3207 ऑक्सिजन बेडची कमतरता भासेल – 462 आयसीयु बेड शिल्लक राहतील – 647 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल

जिल्ह्याचा मृत्युदर – पुणे मनपा – 2 टक्के – पिंपरी चिंचवड – 1.4 टक्के – पुणे देहू व खडकी कॉनटोन्मेंट बोर्ड – 2.3 टक्के – पुणे ग्रामीण – 1.9 टक्के – पुणे जिल्ह्याचा एकूण मृत्यू दर – 1.8

संबंधित बातम्या 

राज्यात अंशत: लॉकडाऊन शक्य, ठाकरे सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांचा इशारा, नियमही सांगितले!   

बचेंगे तो और भी लढेंगे, मुंबईच्या महापौरांनी मूठ आवळली, लॉकडाऊन की निर्बंध लवकरच घोषणा

(Pune Corona lockdown update : malls, hotel, PMPML bus service closed for seven days, 10th, 12th, MPSC exams will be held at the scheduled time)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?