ससूनमधून पळताना आरोपी महिला आठव्या मजल्यावरुन पडली, अ‍ॅड दीप्ती काळेचा मृत्यू

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे 42 वर्षीय दीप्ती काळेने ससून रुग्णालयाच्या इमारतीतून उडी घेत आत्महत्या केली, असं वृत्त आधी समोर आलं होतं (Pune Adv Deepti Kale Dies )

ससूनमधून पळताना आरोपी महिला आठव्या मजल्यावरुन पडली, अ‍ॅड दीप्ती काळेचा मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 10:00 AM

पुणे : मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या अ‍ॅड. दीप्ती काळे (Adv Deepti Kale) चा रुग्णालयातून पळून जाताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बाथरुममधून पळ काढण्याचा काळेचा प्रयत्न होता. मात्र आठव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे तिला प्राण गमवावे लागले. कोरोना संसर्ग झाल्यामुळे तिला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. (Pune MCOCA Accuse Adv Deepti Kale Dies after trying to flee from Sasoon Hospital Bathroom)

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे 42 वर्षीय दीप्ती काळेने ससून रुग्णालयाच्या इमारतीतून उडी घेत आत्महत्या केली, असं वृत्त आधी समोर आलं होतं. परंतु पळून जाताना पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आठव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

सराफाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाला धमकावल्या प्रकरणी आणखी एक तक्रार तिच्याविरोधात दाखल झाली. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केलेल्या टोळीची दीप्ती काळे ही प्रमुख होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी तिच्यावर कालच मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.

बाथरुममधून पळण्याचा प्रयत्न

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दीप्तीला ससून रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आंघोळीला जात असल्याचे कारण सांगून ती बाथरुममध्ये गेली. त्यानंतर खिडकीच्या काचा सरकवून पाईपवरुन उतरण्याचा तिने प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पसार होण्याच्या प्रयत्नात तिचा पाय निसटला आणि ती थेट आठव्या मजल्यावरील डक्टमधून खाली पडल्याची माहिती आहे.

उपचारापूर्वीच मृत्यू

बराच वेळ होऊनही बाहेर न आल्यामुळे पोलिसांनी बाथरुमचा दरवाजा ठोठावून पाहिला. कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने दार उघडून पाहिले असता काचा सरकवल्याचे पोलिसांना दिसले. त्यानंतर परिसराची पाहणी केली असता दीप्ती खाली गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दीप्तीला मृत घोषित केले.

संबंधित बातम्या :

पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह महिलेची आत्महत्या; इमारतीवरून मारली उडी

(Pune MCOCA Accuse Adv Deepti Kale Dies after trying to flee from Sasoon Hospital Bathroom)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.