Pune Metro : पुणे मेट्रो स्थानक बनणार हटके, ऐतिहासिक ‘मावळा पगडी’चे लूक अंतिम टप्प्यात

Pune Metro : पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकावर साकारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक 'मावळा पगडी'चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मावळा पगडीमुळे पुणे मेट्रो हटके बनणार असून शहराचे वारसा अन् सौदर्यं याचा अनोखा संगम दिसणार आहे.

Pune Metro : पुणे मेट्रो स्थानक बनणार हटके, ऐतिहासिक 'मावळा पगडी'चे लूक अंतिम टप्प्यात
Pune Metro
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 11:10 AM

पुणे : पुण्याची ओळख ऐतिहासिक शहर अशी आहे. पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक अन् सांस्कृतिक वारसा या शहराला लाभला आहे. पुणे शहर हे विद्येचे माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. इतकेच नाही तर पुणे शहराला स्वतःची एक वेगळी ओळख, संस्कृती आहे. मग शहराचा विकास करताना हा वारसा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यात सुरु झालेल्या मेट्रोला ‘मावळा पगडी’चे लूक दिले जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आला आहे. यासंदर्भातील छायाचित्र मेट्रोने जारी केले आहेत.

संभाजी महाराज उद्यानाजवळ काम

पुणे मेट्रो मार्गावरील स्थानक उभारले जात आहे. या स्थानकाला मावळा पगडीचा लुक दिला गेला आहे. शहरातील विविध मेट्रो स्थानकांना शहराची ओळख निर्माण करुन देणारे पारंपरिक लुक देण्याचे महामेट्रोने ठरविले आहे. त्यानुसार मेट्रो स्थानकाची रचना केली जात आहे. पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकावर ऐतिहासिक ‘मावळा पगडी’चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मावळा पगडीचा एक प्रकार जो सन्मानाचे प्रतीक असून महाराष्ट्रीयन संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. टेक्ला सॉफ्टवेअरचा वापर करून प्रगत स्ट्रक्चरल डिझाईन तयार करणाऱ्या कॉन्स्ट्रक्टेबल बीआयएम सॉफ्टवेअरने हा आराखडा केला आहे.

हे सुद्धा वाचा

Pune Metro

देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन

पुण्यात देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन होत आहे. पुण्यातील सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन जवळपास तयार झाले आहे. हे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. स्टेशनची खोली अंदाजे 31 मीटर म्हणजे108 फूट पेक्षा जास्त आहे. यामध्ये 18 एस्केलेटर आणि आठ लिफ्ट्स बसवल्या आहेत.

काय आहेत वैशिष्ट्ये

  1. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर कार, बाईक आणि सायकलसाठी पार्किंगची जागा
  2. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन कॉम्प्लेक्सला जोडण्यासाठी भुयारी मार्ग बांधला जात आहे.
  3. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनला हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या तिसऱ्या लाईनशी जोडण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज

कोच अ‌ॅल्युमिनियम धातूपासून

मेट्रोचे कोचेस संपूर्णपणे अ‌ॅल्युमिनियम धातूपासून निर्माण केलेले आहेत. कोलकाता स्थित तितागड वॅगन कंपनीने पुण्याच्या महामेट्रोसाठी अ‌ॅल्युमिनियमच्या कोचचे लाँचिंग केलं आहे. तितागड वॅगन कंपनीला डिझाईन, उत्पादन, पुरवठा अशा अटींवर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी कंत्राट दिले होते.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.