AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रोमुळे पुण्याची ‘आधुनिक पुणे’ अशी ओळख निर्माण होणार; मेट्रोसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही: अजित पवार

पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते. (pune metro will change identity of historical city pune, says ajit pawar)

मेट्रोमुळे पुण्याची 'आधुनिक पुणे' अशी ओळख निर्माण होणार; मेट्रोसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही: अजित पवार
Ajit Pawar
| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 12:00 PM
Share

पुणे: पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते. आता मेट्रोमुळे पुण्याची ओळख ‘आधुनिक पुणे’ अशी होणार आहे, असं सांगतानाच मेट्रोच्या कामासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. (pune metro will change identity of historical city pune, says ajit pawar)

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. आज सकाळी 7 वाजताच हा कार्यक्रम पार पडला. पुणे मेट्रोने उर्वरीत काम जलद गतीने पूर्ण करावे, कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.

पुणेकरांचं स्वप्न पूर्ण होणार

अत्याधुनिक, आरामदायी प्रवासाचे जलद व वेळेवर पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करणारी ट्रायल रन ठरणार आहे. पुणेकरांना निर्धारीत वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेसोबतच पुणेकरांचे वेळेचे गणित जुळवून आणणाऱ्या वाहतूक आधुनिक व्यवस्थेची ही ट्रायल रन आहे. या ट्रायल रनच्या निमित्ताने पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. महामेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरात सुरु असणारे मेट्रो रेल्वेंचे काम निर्णायक टप्प्यावर आहे. लॉकडाऊनच्या काळातही काम सुरु होते. 60 टक्के काम आजच्या घडीला पूर्ण झाले आहे. अत्यंत वेगाने,विश्वासाने, निर्धाराने,कोणताही अपघात न होता, हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यात महामेट्रोच्या, पुणे मेट्रोच्या सर्व इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी बांधवांची मोठी मेहनत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

सायकल, दुचाकीचं शहर ही ओळख पुसणार

पुणे मेट्रोची सगळ्या मार्गांची कामे पूर्ण होऊन, ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर, सायकल, मोटरसायकल, दुचाकीचे शहर अशी ओळख असणारं पुणे शहर, हे मेट्रो वाहतुकीचे शहर म्हणून ओळखलं जाईल. पुणे मेट्रोमुळे रस्त्यावरचा वाहनांचा, वाहतुकीचा, प्रदुषणाचा ताण कमी होईल. वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल. पुणेकर त्यांच्या निर्धारित ठिकाणी, निर्धारीत वेळेत पोहोचू शकतील. दुसऱ्याला दिलेली वेळ आणि वेळेचं गणित, पुणेकर भविष्यात पाळू शकतील, असा विश्वास व्यक्त करतानाच मेट्रो रेल्वेसेवा ही प्रदुषणविरहीत सेवा असल्याने प्रदुषण होणार नाही. रस्त्यांवरची वाहने कमी झाल्याने, त्या माध्यमातून होणारे प्रदुषणही कमी होईल. पुणे शहर आणि परिसरातली वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुण्याभोवती रिंग रोड करण्यात येणार आहे. वाहतुकीची समस्या हीच पुणे शहाराची प्रमुख समस्या आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून ती काही प्रमाणात निश्चितच सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मेट्रोलाईनवर 30 मेट्रो स्टेशनचा समावेश

कोणत्याही परिस्थितीत पुणे मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुणे मेट्रो पुणे शहरातून 33.20 किलोमीटर अंतर धावणार आहे. या मेट्रोलाईनवर 30 मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या एकूण लांबीपैकी 27.28 किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर पूलावरुन धावणार आहे. तर पुण्याच्या खालून बोगद्यातून 6 किलोमीटर मेट्रो धावणार आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोच एकूण काम जवळपास 60 टक्के पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोने उर्वरीत काम जलद गतीने पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

पुणे मेट्रो रेल प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

1. देशातील सर्वात हलके मेट्रो कोच

*कमी वजनाच्याअ‍ॅल्युमिनियम बॉडीसह बनलेले. *डिझाइन गती 95 किमी प्रतितास. *प्रवासी क्षमता 975 पॅक्स / 3 कार ट्रेन (6 कारसाठी विस्तारित करण्याची क्षमता)

2. सुरवातीपासून सौर ऊर्जेचे एकत्रीकरण

*11.19 मेगावॅटएकूण सौर उर्जा स्थापित करण्याची योजना. *त्यामुळं प्रति वर्षी 20 कोटींची बचत. *दर वर्षी अंदाजे 25 हजार टन कार्बनडायऑक्साईड उत्सर्जनापासून सुटका.

3. नावीन्यपूर्ण यूजी स्टेशनची रचना

*दोन मेट्रो स्थानके: मंडई व बुधवारपेठ मेट्रो स्थानकांना या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधणार. *या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं जागेची बचत झाली. *शहरातील सुमारे 200 रहिवाशांचे पुनर्वसन टाळले.

4. ‘कचरे से कांचन तक’डम्पिंग साइटचे डेपोमध्ये रूपांतर

*कोथरूड कचरा डम्पिंग साइट 12.2 हेक्टर क्षेत्रामध्ये पसरली आहे. *3 लाख 80 हजार घनमीटर कचरा असणाऱ्या या जागेची रुपांतर सुंदर परिसरात होणार.

5. कार्यक्षम पाणी व्यवस्थापन

*सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया करण्यासाठी ‘अनॅरोबिक बायोडायजेस्टर तंत्रज्ञाना’चा वापर करण्यासाठी ‘डीआरडीओ’सोबत सामंजस्य करार. *बहुतांश स्थानकांमधून मनपाच्या गटारलाईनमध्ये सांडपाणी सोडण्यात येणार नाही. *प्रत्येक स्टेशनवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणार.

6. वृक्षारोपण आणि पुनर्रोपण

*शक्यतो झाडे तोडायची नाहीत ही महामेट्रोची पॉलिसी आहे, नाईलाजाने झाडेकाढण्याची वेळ आल्यास ती न तोडता त्या झाडांच ‘रुट बॉल’ पध्दतीनं पुनर्रोपण करण्यात येते. *पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 1 हजार 698 झाडांचं पुनर्रोपण तर 11 हजार 683 नवीन झाडांची लागवड करण्यात आली.

7. ‘पीपीपी’ तत्वावर पार्किंग कम कमर्शियल डेव्हलपमेंट:

*स्वारगेट मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब – 2.10 दशलक्ष चौरस फुट क्षेत्र. *सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन – 1.02 दशलक्ष चौरस फुट क्षेत्र. *रेंज हिल डेपो -2.09 दशलक्ष चौरस फुट क्षेत्र. *हिल व्ह्यू कार पार्क डेपो, कोथरूड –1.87 दशलक्ष चौरस फुट क्षेत्र. (pune metro will change identity of historical city pune, says ajit pawar)

संबंधित बातम्या:

बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं, त्यामुळे संख्याबळ नसूनही भाजपचे भागवत कराड महापौर झाले, गडकरींचा भन्नाट किस्सा

अजितदादांचा पुणे मेट्रोला हिरवा झेंडा, वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पहिली ट्रायल रन

VIDEO | डोंगर कोसळला आणि गावच गायब झाले, माळीण दुर्घटनेची वेदनादायी सात वर्ष

(pune metro will change identity of historical city pune, says ajit pawar)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा