मनसे नेते वसंत मोरे पक्षात पुन्हा नाराज? आता काय आहे कारण?

गेल्या वर्षभरापासून अधूनमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरातील नेते वसंत मोरे पक्षात नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. आता पुन्हा एका स्थानिक कारणामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधला आहे.

मनसे नेते वसंत मोरे पक्षात पुन्हा नाराज? आता काय आहे कारण?
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 6:36 PM

योगेश बोरसे, पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरातील नेते वसंत मोरे पक्षात नाराज असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. आता पुन्हा वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावेळी नाराजी स्थानिक राजकारणामधून झाली आहे. वर्षभरापासून पक्षात वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्या दरम्यान इतर पक्षांकडून त्यांना अनेक ऑफर आल्या. परंतु आपण मनसेतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यंदा मनसे कसबा विभागाच्या वतीने आरतीचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा गुरुवारी सुरु झाली.

मागील वर्षी यामुळे नाराज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी २०२२ मध्ये घेतलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. त्यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतलीय. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे वसंत मोरे यांची चांगलीच गोची झाली. त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर पक्षाकडून मोरे यांची ती वैयक्तिक भूमिका असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतर पुणे मनसे अध्यक्षपदावरून वसंत मोरे यांना हाटवण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे मनसेच्या अध्यक्षपदी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची नियुक्ती करण्यात आलीय होती. तेव्हापासून वसंत मोरे नाराज असल्याच्या बातम्या सुरु झाल्या.

हे सुद्धा वाचा

आता काय आहे नाराजी

आता मनसे नेते वसंत मोरे पक्षात नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली. मनसे कसबा विभागाच्यावतीने राम नवमीला आरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत वसंत मोरे यांचे नाव नव्हते. यासंदर्भात वसंत मोरे यांनी पक्षातील वरिष्ठांशी चर्चा सुरु केली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले वसंत मोरे

माझ्या विरुद्ध पक्षातून षडयंत्र केले जात आहे. ठरवून पक्षातील काही लोकांकडून मला डावललं जात आहे. शिवतीर्थावर दोन नंबरच्या रांगेत बसणारा मी आहे. परंतु माझं नाव पत्रिकेत वगळलं जातंय.  मला आता ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. मी लवकरच राज ठाकरे यांच्यांशी बोलणार आहे.

पक्षात केली अनेक कामे

मनसे नेते वसंत मोरे यांनी निवडणुका नसतानाही कोरोनाच्या काळात अनेकांना उपचार दिले. स्वतः हॉस्पिटल उभारुन लोकांना दाखल करुन घेतलं. रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही म्हणून महापालिका अधिकाऱ्यांच्या गाड्याही फोडल्या. टोलनाक्याच्या अडचणी, मालवाहतूकदारांच्या समस्या, छोटे-मोठे वाद प्रत्येक ठिकाणी वसंत मोरे हिरीरीनं पुढे राहिले आहेत. पक्ष अडचणीत असतानाही वसंत मोरेंनी पक्षाची साथ सोडली नाही. यामुळे पक्षात त्यांचे महत्व राहिले होते. परंतु राज ठाकरे यांच्या भूमिकेशी विरोधात भूमिका घेतल्यापासून त्यांचे पक्षातील स्थान कमकुवत झाले आहे.

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.