AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rape case : पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला पुन्हा गुनाटमध्ये आणलं; समोर आलं मोठं कारण

मोठी बातमी समोर येत आहे, गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये स्वारगेट बसस्थानकात उभ्य असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता, या घटनेसंदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे.

Pune rape case : पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला पुन्हा गुनाटमध्ये आणलं; समोर आलं मोठं कारण
Dattatray GadeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 07, 2025 | 4:17 PM
Share

गेल्या आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो पुणे जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. दरम्यान घटनेनंतर तो फरार झाला होता. तो त्याच्याच गावात लपल्याचा पोलिसांना संशय होता.

त्यानंतर त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल तेरा पथकांची नियुक्ती केली होती. गुणात गावाला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली दरम्यान आता पुन्हा एकदा पोलीस आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या गावी गुणाटमध्ये घेऊन आले आहेत.  दत्तात्रय गाडे याला रात्री जिथे पकडण्यात आलं होतं, तिथे पोलीस त्याला घेऊन आले आहेत. पोलिसांना दत्तात्रय गाडे याचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यातून या प्रकरणात काही महत्त्वाचा पुरावा मिळू शकतो. त्यासाठी आता दत्तात्रय गाडे याला पुन्हा एकदा त्याच्या गावी गुणाटमध्ये आणण्यात आलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

गेल्या आठवड्यामध्ये पुण्यात एक खळबळजनक घटना घडली, पुणे स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केलं आहे. दरम्यान पीडित तरुणीच्या वैद्यकीय अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे, आरोपीनं या तरुणीवर एकदा नाही तर दोनदा अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान या प्रकरणानंतर पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यासह शिवसैनिकांनी या घटनेनंतर स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केली. जेव्हा ही घटना घडली तेव्हा बस सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनबाहेर उभी होती असा आरोप या प्रकरणात वसंत मोरे यांनी केला आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?