Pune News : टोमॅटो आले पुन्हा चर्चेत, नारायणगावात आता किती मिळाला दर?

Pune tomato News : टोमॅटो असो की कांदे शेतकरी किंवा ग्राहक दोघांपैकी एखाद्याला नेहमी रडवणारे हे पीक ठरते. कधी दर खूपच जास्त असतात तर कधी शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून द्यावे लागतात. परंतु यंदा भाव खल्लेल्या टोमॅटोने शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून दिले आहे.

Pune News : टोमॅटो आले पुन्हा चर्चेत, नारायणगावात आता किती मिळाला दर?
tommatoImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 7:57 AM

सुनिल थिगळे, नारायणगाव, पुणे | 11 ऑगस्ट 2023 : देशातील शेतकऱ्यांसमोर नेहमी संकटे कधीच संपत नाही. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळाच्या फेऱ्यात शेतकरी येतो. त्यातून बाहेर पडल्यावर शेतमालास दर मिळत नाही. कांदा आणि टोमॅटोची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार या प्रश्नांना समोरे जावे लागते. अनेक वेळा दर मिळत नसल्यामुळे टॉमेटो अन् कांदे भाव नसल्यामुळे रस्त्यावर फेकून द्यावे लागते. यंदा टोमॅटो पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले. टोमॅटोचे हब म्हणून ओळखले जाणाऱ्या नारायणगावात यंदा कोट्यवधींचे उलाढल झाली.

आता काय आहे परिस्थिती

नारायणगाव बाजारात टोमॅटोचे भाव कोसळले आहे. बाजार समितीत टोमॅटोची आवक वाढल्याने बाजार कोसळले आहे. यंदा जुलै महिन्यात टोमॅटोच्या क्रेटला सर्वाधिक 3500 रुपये बाजारभाव मिळाला होता. परंतु आता गुरुवारी नारायणगाव बाजार समितीत नऊ हजार क्रेटची आवक वाढली. यामुळे 20 किलोच्या क्रेटला अकराशे रुपये बाजार भाव मिळाला आहे.

किती झाली उलाढाल

एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १७ लाख ९९ हजार क्रेटची खरेदी, विक्री झाली आहे. यामाध्यमातून बाजार समितीमध्ये १०७ कोटींची उलाढाल झाली आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची उलाढाल टोमॅटो लागवडीतून केली.

हे सुद्धा वाचा

हजारो तरुणांना रोजगार

नारायणगाव शेतकऱ्यांचा फायदा झाला, त्या प्रमाणे तरुणांना रोजगार मिळाला. दिल्ली, कर्नाटक, गुजरात ओडिशामधून अनेक व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी आले. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातूनही अनेक व्यापारी नारायणगावात आले. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला.

यंदा का मिळाला सर्वाधिक भाव

यंदा देशात टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. यामुळे देशात टोमॅटोला चांगला बाजार भाव मिळला. गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटोचे उत्पादन झाले. त्यामुळे यंदा टोमॅटोला आतापर्यंतचा सर्वाधिक 3500 रूपये क्रेटला भाव मिळाला होता. परंतु आता टोमॅटोची आवाक वाढल्यामुळे दर कमी होऊ लागले आहे. आता हा दर 700 ते 1000 रुपये भाव मिळत आहे. यामुळे ग्राहकांना आता लवकरच स्वस्त टोमॅटो  मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

Non Stop LIVE Update
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.