नसरापूर प्रकरण… 2 प्रकरणातून निर्दोष सुटका होताच आरोपीने केली भयंकर गोष्ट, ज्यामुळे तपासात अडथळे
नसरापूर प्रकरण राज्यात संतापाची लाट उसळली आहे... 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या कांबळे याची 2 प्रकरणातून निर्दोष सुटका होताच, त्याने भयंकर गोष्ट केलेली. ज्यामुळे तपासात अडथळे निर्माण झाले.

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात आता मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामागे कारण देखील फार गंभीर आहे. पुण्यातील नसरापूर येथील 65 वर्षांच्या नराधम आरोपीने 4 वर्षांच्या मुलीचा बलात्कार केला आणि तिची हत्या केली… ही आरोपीची पहिलीच वेळ नव्हती, याआधी देखील त्यांनी अनेक महिलांसोबत वाईट कृत्य केलं आहे. धक्कादायक सत्य म्हणजे 2 प्रकरणातून निर्दोष सुटका होताच आरोपी भीमराव कांबळे असं काही केलं ज्यामुळे तपासात अडथळे आहे… मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी केलेल्या दोन गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर आरोपीनं मोबाईल वापरणं केलं.
नराधम भीमराव कांबळे मोबाईलच वापरत नव्हता हे पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही आणि मोबाईल सगळ्यात महत्त्वाचं ठरतात. त्यात सुरुवातीला आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात येतो. त्यानंतर सीसीटीव्ही चेक केला जातो. मात्र या नराधमाकडे मोबाईलच नसल्यामुळे सीसीटीव्ही निर्णायक ठरला आहे.
संबंधित प्रकरणी अधिक माहिती देखील समोर आली आहे. नसरापूर घटनेतील नराधम आरोपी भीमराव कांबळेची तिसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. ससून रुग्णालयात आरोपीची सक्षमता तपासणी करण्यात आली आहे. तपास जलद गतीने करायचा असल्याने सक्षमता तपासणीचा अहवाल तातडीने सादर करण्याचा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
एवढंच नाही तर, नसरापूर घटनेच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात पोलिसांकडून झाली असून तपासाला गती आली आहे. विशेष तपास पथकाने महत्त्वाच्या व्यक्तींची जबाब नोंदवून घेतले आहेत. विशेष तपास पथकाकडून सीसीटीव्ही फुटेज विविध तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आलेत. नराधम आरोपी भिमराव कांबळेला सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची अधिक चौकशी सुरु आहे.
धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सोलापुरात नसरापूर घटनेच्या निषेधार्थ कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. नसरापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. सदर प्रकरणातील नराधम आरोपीला त्वरित फाशी देण्याची मागणी सोलापूरकरांनी केली आहे.
सांगायचं झालं तर, घटनेवर फक्त सामान्य जनतेनेच नाही तर, कलाकारांनी देखील संताप व्यक्त केला आहे. शिवाय भरचौकात नराधमाला फाशी द्या… अशी मागणी देखील होत आहे… सध्या गंभीर प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
