Kishor Aware Murder : किशोर आवारे यांच्या हत्येचे कसे झाले होते ‘डिलिंग’, माहिती आली समोर

Kishor Aware : पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आरोपींनी या हत्येसाठी किती रुपये दिले होते, पैसे कसे दिले जाणार होते, त्याची माहिती समोर आलीय.

Kishor Aware Murder : किशोर आवारे यांच्या हत्येचे कसे झाले होते 'डिलिंग', माहिती आली समोर
Kishor Aware Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 5:37 PM

रणजित जाधव, पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या नुकतीच झाली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना पकडले होते. त्यानंतर सूत्रधारापर्यंतही पोलीस पोहचले. आरोपींनी आवारे यांच्या हत्येचा पूर्ण प्लॅनच पोलिसांसमोर उघड केला. पोलिसांनी रघू धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे या आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात माजी नगरसेवक गौरव खळदे असल्याचे समोर आले होते.

का केली होती हत्या

नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आलेलं आहे. अटकेतील आरोपींनीच हत्येमागचं कारण सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

काय झाले होते डिलिंग

पुण्याच्या तळेगावमधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवरेंच्या हत्येची सुपारी कशी ठरली हे आता समोर आलंय. हत्या करणारे आरोपी तुरुंगातून बाहेर येईपर्यंत होणारा खर्च आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणारा खर्च केला जाणार होता. माजी नगरसेवक भानू खळदेंचं बिंग आरोपींनी फोडलं. तसेच गौरव खळदेने हत्येपूर्वी टप्याटप्याने दहा लाख रुपये दिलेत, हे पैसे एक रकमी न देता जानेवारीपासून देण्यात आलेत.

…तर ५० लाखांपर्यंत गेली असती सुपारी

या प्रकरणी खळदे बाप लेकाचे नाव समोर आलं नसतं आणि ठरल्याप्रमाणे झालं असतं तर साधारण चाळीस ते पन्नास लाखांच्या घरात हा सुपारीचा आकडा पोहचला असता. भानू खळदे यांनी स्वतःची बंदूक आणि काडतुसे हरवल्याची तक्रार जानेवारी महिन्यात केली होती. त्यातीलच काडतुसे या हत्येसाठी वापरल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. त्यामुळं मुलगा गौरवसह भानू खळदे ही जानेवारीपासून या कटात सहभागी असल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात आढळून आलंय. त्यामुळेच भानू खळदेला ही आरोपी बनविण्यात आलं असून त्यांचा शोध सुरु आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.