AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Water Cut News : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! 26 जुलैपर्यंत पाणीकपात रद्द, आता दररोज होणार पाणीपुरवठा

Pune Water News : 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत एक दिवसाआडच पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Pune Water Cut News : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! 26 जुलैपर्यंत पाणीकपात रद्द, आता दररोज होणार पाणीपुरवठा
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 7:32 AM
Share

पुणे : पुणेकरांना दिलासा देणारी बातमी आहे. पुण्यातील पाणीकपातीचा (Pune Water shortage) निर्णय 26 जुलैपर्यत रद्द करण्यात आला आहे. खडकवासला धरणसाखळीत जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अखेर पुण्यातील पाणी कपात 26 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील धरणसाखळीत पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुण्यातील धरणसाखळीत पाणीसाठ्यात वाढ झाल्याने 26 जुलैपर्यंत पुणेकरांना पाण्याचा दिलासा मिळणार आहे. आता 26 जुलैपर्यंत पुणेकरांना दररोज पाणीपुरवठा (Water supply) करण्यात येणार आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. आता पाणी कपात तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे (Pune Municipal Corporation) अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली माहिती आहे.

मागच्या आठवड्यात करण्यात आलेली पाणीकपात

जूनमध्ये राज्यात पावसाला सुरूवात झाली असली तरी काही भागात, तलावातील पाणीसाठा घटल्यानं पाणी टंचाई निर्माण झाली होती. पुणे महानगरपालिकेला पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. पावसाने दडी मारल्यानं महापालिकेने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात 4 जुलैपासून एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केलं होतं.

शहराच्या सर्व भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत एक दिवसाआडच पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचेही आवाहनही करण्यात आलेलं. दरम्यान, मागच्या आठवड्या धरणांसह तलावक्षेत्रात झालेल्या दिलासादायक पावसाने पुण्यातील पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईसह पुणे आणि महत्त्वाच्या शहरांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईसह पुण्यातील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाणी प्रश्न निकाली निघण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.

पुण्याला पावसाचा रेड अलर्ट

पुणे शहर आणि परिसरात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  आज घाट माथ्यासह शहर व परिसराला हवामान खात्याने रेड अलर्ट दिलाय. आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यात वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, 14 जुलैपर्यंत शहरात मुसळधारेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या चार दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू असून, रविवारी दुपारनंतर शहरातील सर्व भागांत जोरदार पाऊस झाला होता.  त्यामुळे जूनमध्ये अवघ्या 34 मिमीवर असणार्‍या हंगामातील पावसाने 150 मिमीचा टप्पा रविवारी पार केल्याची नोंद करण्यात आलीय.

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.