गौतमी पाटील हिचा डान्स एक डाव तरी पाह्यला पायजे… वाघोलीत कार्यक्रमच होणार नाही, कारण…

जिथे गौतमी तिथे गर्दी... हे समीकरण आता जणून ठरलेलंच आहे. त्यामुळेच तिचे कार्यक्रम महाराष्ट्रभर घेतले जात आहेत. गौतमीचा डान्स एक डाव तरी पाहिला पाहिजे, असं तिच्या चाहत्यांना वाटत असतं. म्हणून तिच्या तारखा आधीच बुक केल्या जात आहेत.

गौतमी पाटील हिचा डान्स एक डाव तरी पाह्यला पायजे... वाघोलीत कार्यक्रमच होणार नाही, कारण...
gautami patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 6:51 AM

पुणे : लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. राज्यभर तिच्या नृत्याचे कार्यक्रम दणक्यात होत आहेत. तिच्या कार्यक्रमांना गर्दीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमासाठी सर्वांचीच धडपड असते. तिच्या तारखा आधीच बुक केल्या जात आहेत. मात्र, पुण्यात गौतमीच्या कार्यक्रमाची तारीख बुक करूनही आयोजकांना तिचा कार्यक्रम घेता येत नाहीये. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला मुकावं लागणार असल्याने तिच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

पुण्यातील वाघोली येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीची तारीखही घेण्यात आली होती. आयोजकांनी हा् कार्यक्रम दणक्यात करण्यासाठी जोरदार तयारीही केली होती. मात्र, पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने वाघोलीकरांची घोर निराशा झाली आहे. पहिल्यांदाच वाघोलीत गौतमीचा कार्यक्रम होणार होता. आता या कार्यक्रमाला मुकावं लागणार असल्याने तिच्या चाहत्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. गौतमीचा डान्स एक डाव तरी पाह्यला पायजे… म्हणून कार्यक्रम आयोजित केला जात होता, आता तोच होणार नसल्याने तिच्या चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.

हे सुद्धा वाचा

दोन कारणं

पुण्यात जी-20ची परिषद होणार आहे. त्यानिमित्ताने पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देश विदेशातून अति महत्त्वाचे व्यक्ती पुण्यात येणार आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पुणे पोलिसांवर आला आहे. त्यामुळे पुणे पोलीस या सुरक्षेत व्यस्त आहेत. तसेच पंढरपूरची वारी सुरू झाली आहे. या वारीसाटी पुणे शहरातून पोलिसांची ज्यादा कुमक वारीसाठी पाठवण्यात येणार आहे. जी-20 परिषद आणि वारी या दोन कारणामुळे पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरं आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

मनुष्यबळाचा अभाव

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत असते. एकावेळी हजारो लोक तिच्या कार्यक्रमाला हजर असतात. शिवाय तिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजीही होत असते. त्यामुळे तिच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त पुरवणे आवश्यक असते. मात्र, पुणे पोलिसांवर आधीच दोन महत्त्वाच्या कामाचा ताण आहे. वारी आणि जी-20साठी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांचा बंदोबस्त पुरवता येणार नसल्याने पोलिसांनी वाघोलीत गौतमीचा कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारली आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात होणाऱ्या वादामुळे पोलिसांची सावध भूमिका घेतली आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.