कायदा तोच, कारवाई नवीन, पुणे पोर्श अपघात प्रकरणात आरोपीची सुटका, तीव्र संताप आणि नंतर सिस्टिम हादरली, 4 दिवसांत असा दिसला बदल

Pune Porsche Car Accident : पुणे येथील पोर्श कार अपघातात बाल न्याय मंडळापासून ते पोलिसांपर्यंत सर्व यंत्रणा आता कामाला लागली आहे. अपघातानंतर आरोपीला पाहुणचार करणारे हात आता तपासात आणि चौकशीत गुंतले आहेत. असा झाला या चार दिवसांत बदल...

कायदा तोच, कारवाई नवीन, पुणे पोर्श अपघात प्रकरणात आरोपीची सुटका, तीव्र संताप आणि नंतर सिस्टिम हादरली, 4 दिवसांत असा दिसला बदल
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 3:27 PM

पुणे पोर्श कार प्रकरणात पोलिसांपासून ते इतर बड्या संस्थांची भूमिका संशयाच्या फेऱ्यात आली होती. सर्वसामान्यांपासून ते बड्या सेलेब्रिटींनी याप्रकरणी सरकारी व्यवस्थेवर वज्रमूठ उभारल्यानंतर ‘सिस्टिम’ एकदम हादरली. अल्पवयीन आरोपीचा पाहुणचार करणारे हात, चौकशी आणि तपासाच्या कामाला लागले. देशभरातून याप्रकरणावर तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर यंत्रणेला घाम फुटला. बाल न्याय मंडळापासून ते पोलिसांची भूमिका या चार दिवसांत अशी बदलली.

ठळक असा बदल

  • पुणे पोर्श अपघात प्रकरणात गेल्या चार दिवसांत मोठे बदल झाले. रविवारी बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला एक निबंध लिहण्यास सांगत जामीन दिला होता. बुधवारी जामीन रद्द करण्यात आला. तर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याची न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला येरवडा येथील बाल सुधारगृहात 5 जूनपर्यंत पाठवले आहे. या बाल सुधारगृहात 30 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलं आहेत.
  • आरोपीची मानसिक चाचणी करण्यात येणार आहे. आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, बाल न्याय मंडळाने जामीन रद्द केला नाही तर, मागील आदेशात बदल केला आहे. जामीन रद्द केला असता तर आरोपीला ताब्यात घ्यावे लागले असते. पण मंडळाने त्याला सुधारगृहात पाठवले आहे.

आतापर्यंत काय आले समोर

हे सुद्धा वाचा
  1. आरोपीने अपघात करण्यापूर्वी दारु पिली होती. तो मित्रांसोबत एका बारमध्ये दारु पित होता. त्यासाठी त्याने 48 हजार रुपये खर्च केले.
  2. रात्री सव्वा तीन वाजता आरोपी भरधाव कार चालवत होता. दुचाकीवरील अनिष अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना त्याने जोरदार धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला.
  3. पोलिसांनी प्रकरणात आरोपीच्या वडिलाला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. हॉटेल आणि बारच्या मॅनेजरला अटक केली. विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांना दारु दिल्याचे निष्पन्न झालेले आहे.

आता पुढे काय?

  1. सध्या आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या काळात पोलीस त्याची चौकशी करत आहेत. मुलाकडे कार चालविण्यासाठीचा वाहन परवाना नाही, हे माहिती असताना त्याच्या हातात कार देण्यात आली. मुलगा दारु पितो हे माहिती असतानाही त्याला पार्टी करण्याची परवानगी दिली.
  2. अल्पवयीन आरोपीला येरवडा येथील बाल सुधारगृहात 5 जूनपर्यंत पाठविण्यात आले आहे. तिथे त्याची मानसिक चाचणी करण्यात येणार आहे.
  3. अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालविण्यासाठी अपील करण्यात आले. त्यावर पोलिसांना निकालाची प्रतिक्षा आहे.
  4. पुण्यातील कार अपघात प्रकरणात वेदांत अग्रवाल याच्यासोबत पार्टीसाठी उपस्थित असलेल्या मित्राची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तपासात गरज वाटेल तशी चौकशी केली जाणार असल्याचे समोर येत आहे. मित्रांची पण चौकशी करायला सुरूवात झाली आहे.
Non Stop LIVE Update
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.