Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळांना जेलमधून मी बाहेर काढलं, त्यांनी कधी…; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा

Prakash Ambedkar on PM Narendra Modi Chhagan Bhujbal : येत्या निवडणुकीत सत्ताबदल अटळ आहे. पण पंतप्रधान म्हणून मोदी...; प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने लक्ष वेधलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. पुण्यात बोलताना प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा...

छगन भुजबळांना जेलमधून मी बाहेर काढलं, त्यांनी कधी...; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 1:25 PM

योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 28 नोव्हेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर भाष्य केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाचं विधान केलं. आता परत मला इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसीचा लढ्याचा जनक मी आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले…

तीन दिवसापूर्वी मुस्लिम संघटना बैठक मुंबईमध्ये झाली. 8 डिसेंबरला मुस्लिम संघटना पॅलेस्टाईन विषय आझाद मैदानावर सभा घेणार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर सामान्य माणसाने विचार करायला हवा. हा मुस्लिमांचा विषय आहे. म्हणून सोडून द्यायचं, असं भाजप सांगत आहे. सरळ प्रश्न आला. सरळ उत्तर येईल. पण मला प्रश्न येईल. तसं उत्तर देणार… एकदा बोललो की, बोललेलं विधान मी कधीच मागे घेत नाही. मागे घेणार नाही. राज्यात सध्या दंगली कधीही घडू शकतात, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

“महात्मा फुलेंमुळे धार्मिक स्वतंत्र”

स्त्री शिक्षणासाठी लढा उभारणारे महात्मा फुले यांचा आज स्मृतीदिन आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्यात जात प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केलं. यावेळी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. महात्मा फुले यांनी जो लढा सुरू केला. त्याची फळं आपण चाखतो आहोत. त्यांच्या त्या लढ्यामुळे आपल्याला सामाजिक धार्मिक स्वतंत्र मिळालं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त फुलेवाड्यात कार्यक्रम

महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात समता दिनानिमित्त महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समता पुरस्कार सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती आहे. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महात्मा फुले वाड्यात समता पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार वरिष्ठ पत्रकार संजय आवटे यांना प्रदान करण्यात आला. समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे.

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....