लॉकडाऊन इफेक्ट! पुण्यात घराच्या किंमती महागण्याची शक्यता, बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्या

अनेक बांधकाम साहित्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील बांधकाम प्रकल्पांना उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Pune property Prices May Increase)

लॉकडाऊन इफेक्ट! पुण्यात घराच्या किंमती महागण्याची शक्यता, बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्या
property
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 8:21 AM

पुणे : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अनेक बांधकाम साहित्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील बांधकाम प्रकल्पांना उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Pune property Prices May Increase after construction materials rise)

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय क्रेडाईच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. गेल्या 24 मे ते 3 जूनदरम्यान देशातील टीअर I, II, III अशा एकूण 217 शहरांमधील बांधकाम व्यवसायाचा यावेळी आढावा घेण्यात आला. या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

बांधकाम साहित्याच्या किंमतीत सातत्याने वाढ

पुणे शहराचा विचार केल्यास प्रामुख्याने 94 टक्के व्यावसायिकांना बांधकाम मजुरांची कमतरता भासत आहेत. तसेच आवश्यक साहित्याच्या वाढत्या किंमती आणि बांधकाम परवानग्या मिळण्यास होणारा विलंब इत्यादी बाबींचा शहरातील बांधकाम क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच बांधकाम साहित्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

तसेच तब्बल 52 टक्के बांधकाम व्यावसायिकांना कर्जाची परतफेड करण्यासाठी अडचण येत आहे. तर तब्बल 91 टक्के व्यावसायिकांना ग्राहकांकडून नियोजित खरेदी रक्कम मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच अनेक ग्राहकांनी कोरोनामुळे घर घेण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

बांधकामासाठी आवश्यक परवानग्या मिळत नसल्याचा दावा

त्याशिवाय सध्या पुणे शहरातील 44 टक्के बांधकाम व्यावसायिक 25 ते 50 टक्के कमी क्षमतेने काम करीत आहेत. त्यातच बांधकाम साहित्य आणि मजुरांसाठी येणाऱ्या खर्चात 10 ते 20 टक्के वाढ झाल्याचे 54 टक्के व्यावसायिकांचे मत आहे. बांधकामासाठी आवश्यक परवानग्या वेळेत मिळत नाहीत असा व्यावसायिकांचे म्हणणं आहे.

ग्राहकांना गृहकर्जाच्या समस्या

तसेच ग्राहकांकडून नियोजित खरेदी रक्कम येण्यासंबंधी अडचणी येत आहेत. ग्राहकांच्या चौकशीमध्ये 75 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तर 75 टक्के व्यावसायिकांच्या ग्राहकांना गृहकर्जाच्या समस्या भेडसावत आहेत. 82 टक्के व्यावसायिकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे.

त्यातच बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या स्टील आणि सिमेंटच्या किमती सातत्याने वाढत आहेत. तर दुसरीकडे ग्राहकांची संख्या कमी होत आहे, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने स्टील आणि सिमेंटच्या किमतीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.  (Pune property Prices May Increase after construction materials rise)

संबंधित बातम्या : 

मराठा क्रांती मूक मोर्चा ही वादळापूर्वीची शांतता, आता…. संभाजीराजेंचा फेसबुक पोस्टमधून इशारा

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिस सरसावले, My Pune Safe ॲपची निर्मिती, वैशिष्टयं काय?

सोमवारपासून पुणे शहरातील निर्बंध शिथिल करणार, पण लक्षात ठेवा…; अजितदादांनी बजावले

Non Stop LIVE Update
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.