Pune VVIP Car Park | शरद पवार साहेबांच्या पायाच्या त्रासामुळे गाड्या रेस ट्रॅकवर, क्रीडा आयुक्तांचं स्पष्टीकरण
पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धावपटूंसाठी तयार केलेल्या रेस ट्रॅकवर शरद पवारांसह व्हीव्हीआयपी गाड्यांचा ताफा उभ्या करण्यावरुन टीकेची झोड उठली आहे.
पुणे : पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये (Pune Shiv chhatrapati Sports Complex) अॅथलिट्सच्या रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या उभ्या करण्यावरुन वादंग निर्माण झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या क्रीडा आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची गाडी तिथे पार्क करण्यास परवानगी देण्यात आली होती, असं उत्तर ओम प्रकाश बकोरिया यांनी दिलं आहे. (Pune Shiv chhatrapati Sports Complex Sports Commissioner Om Prakash Bakoria reacts on Sharad Pawar VVIP Car Park on racing track)
क्रीडा आयुक्तांचं स्पष्टीकरण काय?
“सिमेंट ट्रॅकवर गाड्या पार्क करण्याची परवानगी देण्याचं कारण म्हणजे पवार साहेबांच्या पायाचा काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यांना चालायला त्रास होऊ नये, म्हणून संमती देण्यात आली होती.” असं स्पष्टीकरण महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिलं आहे. दुर्दैवाने गाड्या रेसिंग ट्रॅकवर उभ्या केल्या गेल्या. त्याबद्दल आपण माफी मागतो. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असं आश्वासनही बकोरिया (Om Prakash Bakoria) यांनी ‘एएनआय’शी बोलताना दिलं.
Vehicles were allowed to be parked on cemented tracks as Pawar Sahab had an issue with his leg. It was allowed so that he doesn’t face problem in walking: Maharashtra Sports Commissioner to ANI on VVIPs’ cars parked on athletes’ race track in Pune’s Shivchhatrapati Sports Complex pic.twitter.com/P4Zm9KtQQs
— ANI (@ANI) June 27, 2021
भाजपची टीकेची झोड
पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धावपटूंसाठी तयार केलेल्या रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या उभ्या करण्यावरुन टीकेची झोड उठली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेस ट्रॅकवर गाड्या पार्क करुन क्रीडा सुविधांचं नुकसान केलं आहे, असा आरोप पुण्यातील भाजप नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
नेमकं काय घडलं?
26 जूनला शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवारांसह काँग्रेस नेते आणि क्रीडा मंत्री सुनील केदार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यासारखे नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या गाड्या रेस ट्रॅकवर पार्क केल्यामुळे टीकेची झोड उठली होती.
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची नाराजी
केंद्रीय क्रीडा मंत्री किरन रिजिजू यांनीही नाराजी व्यक्त केली होती. देशात क्रीडा सुविधा कमी आहेत. सर्वच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची देखभाल नीट करण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
I’m personally very sad to see such disrespect for sports and sporting ethics in our country. https://t.co/XV47LRckmJ
— Kiren Rijiju (@KirenRijiju) June 27, 2021
संबंधित बातम्या :
पवारांच्या घरी बैठक होणार, पण तिसऱ्या आघाडीसाठी नाही; तरीही तर्कवितर्क सुरूच!
(Pune Shiv chhatrapati Sports Complex Sports Commissioner Om Prakash Bakoria reacts on Sharad Pawar VVIP Car Park on racing track)