Lalit Patil : “ललित पाटीलला अटक करण्याचं श्रेय घेत असाल तर त्याला फरार करण्याची श्रेय त्यांना घ्यावंच लागेल”

Sushma Andhare on Devemdra Fadnavis : एवढं सगळं करूनही मुख्यमंत्री होत येत नाही; अजित पवार यांचा दाखला देत सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा. ललित पाटील अटक प्रकरणावरही सविस्तर प्रतिक्रिया. पाहा काय म्हणाल्या सुषमा अंधारे? वाचा सविस्तर...

Lalit Patil : ललित पाटीलला अटक करण्याचं श्रेय घेत असाल तर त्याला फरार करण्याची श्रेय त्यांना घ्यावंच लागेल
Sushma Andhare and devendra fadnavis
| Updated on: Oct 18, 2023 | 11:23 AM

प्रदिप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 18 ऑक्टोबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे.फरार झाल्याच्या 15 दिवसांनंतर चेन्नईमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ललित पाटीलचा जयसिंगहानी होवू नये. ललित पाटीलला जर अटक करण्याचं श्रेय तुम्ही घेत असाल तर फरार करण्याची श्रेय त्यांना घ्यावं लागेल. ललित पाटीलला आम्ही अटक करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर मग त्यांना माहिती होती का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.

ललित पाटील यानं फरार होणं आणि आता त्याला अटक होणं. या सगळ्यात नेमकं काय गौडबंगाल काय आहे? दादा भुसे यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे होतं का? कारखाना कसा उभा राहतो? एवढ्या कोटींचा कारखाना कसा उभा राहतो? ससून रुग्णालयातील 16 नंबर वार्डचं गौडबंगाल काय आहे? याचं सत्य बाहेर आलं पाहिजे. ज्या हॉटेलमध्ये ललित पाटीलचा वावर होता त्या त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जात आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है?, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

अजित पवारांचं मुखमंत्री म्हणून नाव पुढे येताच मॅडम कमिशनर हे पुस्तक कसं बाहेर येतं? अजित पवार यांना रोखण्याची जबाबदारी कोणाची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांची आहे… एवढा सगळं करूनही मुख्यमंत्री होत येत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केला आहे.

गेल्या वर्षी 10 कोटी खर्चून ही त्यांना लोकं गोळा करता आली नाहीत. आमचं हिंदुत्व काय आहे हे आम्ही शिवतीर्थावर सांगू, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार दिलेलं ऊर्जा दिलेलं ठिकाण आहे. उद्या मी तिथं जाऊन धमका करेन. इलाका तुम्हारा और धमका हमारा होगा, असं म्हणत अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल केलाय.