AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | पुणे शहरात झोमॅटो, स्विगीचे पार्सल नाही अन् ओलो उबेर मिळणार नाही…काय आहे कारण

Delivery workers, cab drivers on strike | पुणे शहरात झोमॅटो, स्विगीवरुन मागवलेले जेवण मिळणार नाही. तसेच तुम्हाला ओलो उबेर रिक्षाही बुक करता येणार आहे. यामुळे पुणेकरांची चांगलीच अडचण होणार आहे. हे सर्व बंद असण्यासाठी कारण आहे...

Pune News | पुणे शहरात झोमॅटो, स्विगीचे पार्सल नाही अन् ओलो उबेर मिळणार नाही...काय आहे कारण
ZomatoImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 24, 2023 | 9:30 AM
Share

पुणे | 24 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात बाहेरगावावरुन आलेले अनेक विद्यार्थी आणि नोकरी करणारे युवक-युवती आले आहेत. या सर्वांमध्ये स्विगी आणि झोमॅटो चांगलेच लोकप्रिय झाले आहे. विविध पदार्थांची ऑर्डर बुक करुन घरात पार्सल मागवून जेवण अनेक जण करतात. तसेच रिक्षा चालकांची वाट बघण्यापेक्षा आपल्या मोबाइलने ओला, उबेर बुक करणारे अनेक पुणेकर आहेत. या सर्वांची आता अडचण होणार आहे. कारण २५ ऑक्टोबर रोजी त्यांना झोमॅटो आणि स्विगीवरुन मागवलेले जेवण मिळणार नाही अन् ओलो, उबेरची सेवाही मिळणार आहे. या सर्वांनी बंद पुकारला आहे.

कशासाठी पुकारण्यात आला बंद

ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो यासारख्या कंपन्यांसाठी काम करणारे कॅब आणि रिक्षा चालक आणि पुणे शहरातील झोमॅटो आणि स्विगीची डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. २५ ऑक्टोबर रोजी हा बंप पुकारण्यात आला आहे. राजस्थानमधील कामगार संरक्षण कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात कायदा करण्याच्या मागणीसाठी बंद करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी कायदा हवा आहे.

राजस्थान सरकारने केला कायदा

राजस्थान सरकारने कामगारांसाठी कायदा केला आहे. या पद्धतीने कायदा करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य आहे. राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रात कायदा करण्याची मागणी ओला, उबेर आणि झोमॅटो स्वीगमधील कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासाठी संप पुकारला असल्याचे अॅड केशव क्षीरसागर यांनी म्हटले आहे. कामगार वर्गाला महत्त्वाची सामाजिक सुरक्षा आणि अत्यावश्यक फायदे देणे हा या राजस्थानमध्ये तयार करण्यात आलेल्या कायद्याचा उद्देश आहे. या कायद्यात या कामगारांसाठी गिग वर्कर फंड (Gig Workers Fund and Welfare Fee) उभारण्याची योजना असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

ओला, उबेर विरोधात आंदोलन

ओला-उबेरविरोधात रिक्षा संघटनांनी उद्या आंदोलन पुकारले आहे. ओला-उबेरकडून रिक्षा आणि कॅब चालकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत बुधवारी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रन्सपोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी ही माहिती दिली. या आंदोलनात अनेक रिक्षा चालक सहभागी होणार आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.