Pune Weather | शहरात ऊन-पावसाचा खेळ कायम, पुढचे काही दिवस हलक्या सरी कोसळण्याची शक्यता

पुणे (Pune) शहरात शुक्रवारी ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळाला. पुढचे काही दिवस पुणे आणि परिसरात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Pune Weather | शहरात ऊन-पावसाचा खेळ कायम, पुढचे काही दिवस हलक्या सरी कोसळण्याची शक्यता

पुणे : पुणे (Pune) शहरात शुक्रवारी ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळाला. काही भागात पडलेल्या जोरदार सरींमुळे शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचं पाणी रस्त्यांवरून वाहत होतं. त्यानंतर काही वेळातच कडक ऊन पडलं आणि पुन्हा काही भागात हलका पाऊस झाला. दरम्यान, पुढचे काही दिवस पुणे आणि परिसरात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Chance of light rain in Pune and surrounding areas for next few days)

दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता

आज दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 28 ते 1 ऑगस्टदरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तापमानातही काही प्रमाणात घट होऊ शकते. आज पुण्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहणार आहे. तर रात्रीचं सरासरी तापमान 26 अंश सेल्सिअस असेल. पुण्यात दिवसा वारे 14किमी प्रतितास वेगाने वाहतील तर रात्री वाऱ्याचा वेग 13 किमी प्रतितास असणार आहे. दिवसभरात 2.4 मिमी पावसाची शक्यता आहे.

पुणेकरांची तारांबळ

गेले काही दिवस पावसाने दडी दिल्याने पुण्यात तापमानात अचानक वाढ झाली होती. दिवसा आणि रात्रीच्या सरासरी तापमानातही वाढ झाल्याचं पहायला मिळालं. सकाळपासून ऊन्हाचा चटका जाणवत आहे. गुरूवारी तर दुपारपर्यंत चांगलं ऊन पडलं होतं, पण दुपारनंतर अचानक शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, बावधन परिसरात पाऊस पडला. त्यामुळे विक्रेते, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही भागात वाहतूक कोंडीही झाली होती.

शहर आणि परिसरात पावसाची उघडीप

गेल्या आठवड्यापासून पुणे शहर आणि परिसरात पावसाची उघडीप पहायला मिळत आहे. श्रावण सुरू झाल्यापासून शहरात ढगाळ वातावरण आहे. त्यात कधी कुठल्या भागात हलका पाऊस पडून जातो तर कधी आकाश स्वच्छ होऊन अचानक कडक ऊन पडतं. काल सकाळपासून शहरात आभाळ दाटून आलं होतं. त्यानंतर काही भागात हलका पाऊस झाला. त्यानंतर दुपारी सूर्यप्रकाश पडला.

राज्यातही पाऊस

राज्यातही 28  ते 30 ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तुरळक तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

इतर बातम्या :

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, वर्षा गायकवाड यांची माहिती

संजय राऊतांनी नाशिकमध्ये वात पेटवली, भाजपचा माजी उपमहापौर फोडला?

पुढील महिन्यापासून PF नियमात बदल, लगेच माहिती तपासा अन्यथा तुम्हाला EPFचे पैसे मिळणार नाही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI