AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Weather | काल पावसाची संततधार, आज पुण्यात हलक्या सरींची शक्यता

पुणे : काल पुणे (Pune City) शहर आणि परिसरात जोरदार पाऊस (Rain) बरसल्यानंतर आजही सामान्यतः आकाश ढगाळ राहणार आहे. शहर आणि परिसरात आज अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Pune Weather | काल पावसाची संततधार, आज पुण्यात हलक्या सरींची शक्यता
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 8:59 AM
Share

पुणे : काल पुणे (Pune City) शहर आणि परिसरात जोरदार पाऊस (Rain) बरसल्यानंतर आजही सामान्यतः आकाश ढगाळ राहणार आहे. शहर आणि परिसरात आज अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काल दिवसभर शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होतं. सकाळपासून शहराच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरू होती. दुपारनंतर संततधार थांबली, अनेक भागात हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. लोहगाव परिसरात मात्र, जोरदार पाऊस बरसला. (Light showers are expected in and around Pune today)

वातावरण ढगाळ असल्याने गारवा

पुण्यात आज सरासरी तापमान हे 26 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. कमाल तापमान हे 29 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. पुण्यात दिवसा वाऱ्याचा सरासरी वेग हा 38 किमीप्रतितास असेल. दिवसा वातावरणातलं आर्द्रतेचं प्रमाण हे 75 टक्क्यांपर्यंत असणार आहे. दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सध्या वातावरण ढगाळ असल्याने वातावरणात गारवा आहे. रात्रीचं सरासरी तापमान हे 26 अंश सेल्सिअस असणार आहे. रात्रीच्यावेळी पावसाची शक्यता नाही.

कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक, खानदेशातल्या धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातल्या अनेक भागातला पावसाचा जोर ओसरला

बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यात कोकण, खानदेशातलं वातावरण अंशतः ढगाळ आहे. विदर्भात गेल्या दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. उत्तरेकडे मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर, कोटापासून ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागापर्यंत आहे. त्यामुळे राज्यातल्या अनेक भागातला पावसाचा जोर ओसरला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती मात्र, कायम आहे.

मुंबई हवामान विभागाचा अंदाज काय?

दरम्यान, मुंबई हवामान विभागाने मंगळवारी (31 ऑगस्ट) सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर म्हणाले, “छत्तीसगडवर 30 ऑगस्टला कमी दाबाचे क्षेत्र आहे. 15 अंश उत्तरवर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी IMD पुढील 3-4 दिवसांसाठी काही इशारे देत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणाचाही समावेश आहे.”

इतर बातम्या :

Kasara Ghat | कसारा घाटामध्ये धुक्याची दाट चादर, रस्त्यावर पुढचे वाहनही दिसेना

Parbhani Rain | परभणीत पावसाचं थैमान, स्कॉर्पिओ वाहून जाताना गावकऱ्यांनी 7 जणांना वाचवलं

1 सप्टेंबर गॅस सिलिंडरपासून पीएफ खात्यासंदर्भातील हे 5 नियम बदलणार, सामान्यांवर काय परिणाम?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.