वकिलाने शीतपेयातून महिलेला दिले मादक पदार्थ, मग जावे लागेल कोठडीत

वकिली व्यवसायाला काळीमा फासणारी घटना पुणे परिसरातील वाघोलीमध्ये घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे ओळखीच्या लोकांवर विश्वास ठेवता येणार नाही, हा संदेश गेला आहे. एका वकिलाने महिलेला शीतपेयातून मादक पदार्थ पाजला. त्यानंतर अत्याचार केला.

वकिलाने शीतपेयातून महिलेला दिले मादक पदार्थ, मग जावे लागेल कोठडीत
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 9:39 AM

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोयता गँगचा उद्रेक सुरु असताना बलात्कार, हनीट्रॅपसारख्या घटनाही वाढत आहे. आता पुणे परिसरातील वाघोलीमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिलेला शीतपेयातून मादक पदार्थ पाजला. त्यानंतर अत्याचार केला. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वकिलासह दोघ जणांना पोलीस कोठडीची हवा खावी लागलीय.

काय केले त्या वकिलाने

याप्रकरणी 32 वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडीत तरुणी आणि ॲड. विक्रम भाटे, शिंदे यांची ओळख होती. ॲड. भाटे आणि शिंदे तरुणीच्या घरी गेले होते. त्या वेळी त्यांनी तिला शीतपेयात मिसळून गुंगीचे ओैषध दिले. तरुणीला शीतपेय पिण्यासाठी आग्रह केला. तरुणी बेशुद्ध पडल्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी वकील विक्रम भाटे (वय ३४, रा. हडपसर) आणि वैभव शिंदे (वय ३४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व धक्कादायक घटना जून 2021 ते जानेवारी 2023 दरम्यान वाघोली परिसरात घडली. याप्रकरणी आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओ बनवला

आरोपींनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्यांनी तिला धमकावण्यास सुरुवात केली. हे फुटेज त्या महिलेला दाखवून तिला दुसऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचे चित्रण करून ठेवले. त्यांच्या धमक्यांमुळे तरुणीने पोलिसांकडे फिर्याद दिली. बलात्कार, धमकावणे तसेच अनैसर्गिक कृत्य केल्या प्रकरणी ॲड. भाटेसह शिंदेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हे वाचा

पुणे शहरात वाहने वाढली अन् अपघातही, अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूची संख्या मोठी

पुणे शहरात वाहन खरेदीत मोठी वाढ, कोणत्या वाहनांना आहे पुणेकरांची पसंती?

Non Stop LIVE Update
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.