AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीची हत्या झाली, स्थानिक पोलिसांचा त्रास, पुण्यातील महिलेने गाठला उत्तर प्रदेश

महिलेची मुले आहेत का? मग मुले आईला का सोडून गेली आहेत?  या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे. तसेच महिलेचे इतर कोणी नातेवाईक आहेत का?  याचाही तपास घेतला जात आहे. 

पतीची हत्या झाली, स्थानिक पोलिसांचा त्रास, पुण्यातील महिलेने गाठला उत्तर प्रदेश
| Updated on: Feb 12, 2023 | 2:25 PM
Share

फरेंडा, उत्तर प्रदेश : पुणे शहरातील (Pune Citu) एक महिला उत्तर प्रदेशात पोहचली. फरेंडा येथे असहायपणे भटकत असताना तिला रिक्षा चालकाने पाहिले. तिची चौकशी केली. त्यानंतर तिला धीर देत फरेंडा पोलीस ठाण्यात (Police Staion)नेले. त्या महिलेने पोलिसांसमोर आपबिती सांगितली. पोलिसांनी तिला मदतीचे आश्वासन दिले. परंतु खरी परिस्थिती चौकशीनंतरच समजणार आहे. पतीच्या हत्येनंतर (Crime)पोलिसांचा त्रास सुरु झाला आणि मुलेही सोडून गेल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. महिलेची मुले आहेत का? मग मुले आईला का सोडून गेली आहेत?  या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे.

नेमकी काय आहे घटना

पुणे शहरातील नऱ्हे परिसरात अशोक आर्य पत्नी रुचासह राहत होते. रुचा हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचे पती अशोक आर्य एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. परंतु त्यांची हत्या झाली. पतीच्या हत्येनंतर मुले सोडून हैदराबादला गेले.

नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्थानिक पोलिसांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तिला आपले उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले. मग तिने पुणे सोडले आणि भटकंती करु लागली. भटकता भटकता ती फरेंडा या शहरात पोहचली. रिक्षा चालकाने तिला पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी दिले आश्वासन

रुचा हिची परिस्थिती पाहून फरेंडा पोलिसांनी तिला मदतीचे आश्वासन दिले. तिला विश्वास घेऊन चौकशी केली. तिने घरमालकाचा मोबाईल क्रमांक दिला आहे. पोलिसांनी रुचा हिच्या घरमालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु खरी माहिती चौकशीअंतीच समजणार असल्याचे पोलिसानी सांगितले.

महिलेची मुले आहेत का? मग मुले आईला का सोडून गेली आहेत?  या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे. तसेच महिलेचे इतर कोणी नातेवाईक आहेत का?  याचाही तपास घेतला जात आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.