अपहरण केलं, मध्यरात्री सुनसान जागेवर नेऊन विवस्त्र केलं अन्… पुण्यातील भयंकर प्रकार समोर
पुण्यातील कात्रज कोंडवा रस्त्यावरील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एका तरुणाचे अपहरण करुन त्याला सुनसान जागेवर घेऊन गेले. हे अपहरण त्याच्या जवळच्या मित्रांनीच केले आहे. आता पुढे काय झालं जाणून घ्या...

संस्कृतीचे माहेरघर म्हणून पुणे ओळखले जाते. पण दिवसेंदिवस पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणे वाढत चालल्याचे दिसत आहे. असेच एक धक्कादायक प्रकरण पुन्हा समोर आले आहे. आर्थिक व्यवहारातून झालेला वाद इतरा टोकाला गेला की 31 वर्षीय तरुणाचा मित्रांनीच अमानुष छळ केला. त्याचे अपहरण करुन त्याला सुनसान जागेवर घेऊन गेले. त्यानंतर तरुणाला विवस्त्र केले. त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा घटनेने पुन्हा एकदा राज्यात खळबळज माजली आहे.
नेमकं काय घडलं?
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात ही भयावह घटना घडली. पीडित तरुण वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत आहे आणि तो कोंढवा भागात राहतो. आरोपी हे त्याचे ओळखीचे असून, आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा वाद चिघळल्याने ३१ डिसेंबरच्या रात्री सुमारे ११ वाजता आरोपींनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. आरोपींनी त्याला गोकुळनगरजवळील एका शांत आणि मोकळ्या मैदानात नेले. तिथे त्याला पहिले पूर्णपणे विवस्त्र केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि क्रूरपणे मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. शिवाय शिवीगाळ करताना मंगेश माने याने कारमधील पिस्तुलाचा धाक दाखवला. पीडिताने पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्याच्यावर गोळीबारही करण्यात आला, परंतु सुदैवाने तो बचावला.
आरोपींना अटक
या प्रकरणी पीडित तरुणाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत आयुष कामठे, अभी म्हस्के, अभी पाटील, मंगेश माने, कौशल ऊर्फ ऋषी मोरे यांच्यासह एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. काही आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ही घटना पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे एक गंभीर उदाहरण मानले जात आहे. आर्थिक वादातून इतक्या क्रूर पातळीवर जाणे हे समाजासाठी धोक्याची घंटा आहे. सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, लवकरच इतर आरोपींना अटक करण्यात येणार आहे.
