Pune Election: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर; 15 ते 21 जुलै पर्यंत हरकती तसेच सूचना सादर करता येणार

आरक्षणाबाबत 15 जुलै ते 21 जुलै पर्यंत हरकती तसेच सूचना सादर करता येणार आहेत. 2 ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या निवडणूक विभाग, निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Pune Election: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर; 15 ते 21 जुलै पर्यंत हरकती तसेच सूचना सादर करता येणार
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 3:15 PM

पुणे: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती (Pune Zilla Parishad and Panchayat Samiti) आरक्षण सोडतीचा कार्यक्रम (reservation draw program) जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) निर्देशानुसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम 13 जुलै रोजी जाहीर होणार आहे. सोडत कार्यक्रमानंतर 15 जुलै रोजी निवडणूक विभाग, निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

 15 जुलै ते 21 जुलै पर्यंत हरकती तसेच सूचना

या आरक्षणाबाबत 15 जुलै ते 21 जुलै पर्यंत हरकती तसेच सूचना सादर करता येणार आहेत. 2 ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या निवडणूक विभाग, निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हरकती तसेच सूचना या ठिकाणी स्वीकारणार

आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्धी झाल्यानंतर 15 ते 21 जुलै या कालावधीत पुणे जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या आरक्षणावरील हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, बी विंग, तिसरा मजला, पुणे-४११००१ तसेच संबंधित तहसिल कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा नोडल अधिकारी संजय तेली यांनी सांगितले आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व गणाचे आरक्षण सोडत कार्यक्रम 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या ठिकाणी केले जाणार आहे.

सोडत कार्यक्रम

पुणे जिल्हा परिषद- मा. श्री. शरदचंद्रजी पवार सभागृह, पहिला मजला, पुणे जिल्हा परिषद, पुणे (नविन इमारत) कॅम्प, पुणे.

जुन्नर पंचायत समिती- जिजामाता सभागृह (पंचायत समिती आवार) जुन्नर

आंबेगांव पंचायत समिती- तहसिल कार्यालय आंबेगाव, पहिला मजला, मिटींग हॉल, आंबेगांव शिरुर पंचायत समिती -तहसिल कार्यालय शिरुर, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सभागृह क्र. १ शिरूर खेड पंचायत समिती -चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय, बाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड मावळ पंचायत समिती -भेगडे लॉन, जुना पुणे-मुंबई रस्ता, वडगाव, ता. मावळ मुळशी पंचायत समिती-सेनापती बापट सभागृह, पंचायत समिती मुळशी (पौड), ता. मुळशी हवेली पंचायत समिती-जुनी जिल्हा परिषद, महात्मा गांधी सभागृह, पंचायत समिती हवेली दौंड पंचायत समिती-नवीन प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय दौंड, दुसरा मजला सभागृह, दौंड पुरंदर पंचायत समिती-पंचायत समिती पुरंदर येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृह, सासवड, ता. पुरंदर वेल्हे पंचायत समिती-पंचायत समिती कार्यालय येथील नविन सभागृह , ता. वेल्हे भोर पंचायत समिती-अभिजित भवन मंगल कार्यालय महाड नाका, संजय नगर, ता. भोर बारामती पंचायत समिती-कविवर्य मोरोपंत नाटय मंदीर,इंदापूर रिंग रोड, नवीन प्रशासकीय भवन समोर, बारामती इंदापूर पंचायत समिती-लोकनेते शंकरराव पाटील सभागृह, पंचायत समिती इंदापूर

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.