राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचे सावट, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Rain | महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. उत्तर केरळपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात पाऊस सुरु आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रावर हवेची चक्राकार परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचे सावट, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 7:56 AM

योगेश बोरसे, पुणे, 1 डिसेंबर 2023 | राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम आहे. राज्यात १ आणि २ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे तर कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. १ डिसेंबर रोजी अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस

उत्तर केरळपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रावर हवेची चक्राकार परिस्थिती आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे शहरातही आज पावसाची शक्यता आहे.

22 जिल्ह्यांतील नुकसानाची आकडेवारी

राज्यात 26 ते 28 पर्यंत झालेल्या अवकाळी पावसात 22 जिल्ह्यांतील नुकसानाची प्राथमिक आकडेवारी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. परंतु अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या यादीत अमरावती जिल्हा वगळला गेला आहे. अमरावती जिल्ह्यात नुकसान झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. प्राथमिक आकडेवारीत अमरावती जिल्ह्याचा समावेश नाही. अमरावतीत कापूस, तुरी आणि संत्र्याच मोठे नुकसान झाले आहे. परंतु शासनाच्या नजरेत अमरावती जिल्ह्यात नुकसानच झालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसामुळे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले होते.

हे सुद्धा वाचा

अवकाळी पावसामुळे लाल मिरचीचे दर वाढणार

अवकाळी पावसामुळे लाल मिरचीचे दर वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे मुंबईच्या बाजार समितीत येणाऱ्या लाल मिरचीचे आगमन आता लांबणीवर पडले आहे. त्यामुळे घरोघरी वर्षभरासाठी मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीची टंचाई भासणार आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात दिवाळीनंतर मसाल्याच्या मिरचीची आवक सुरू होते.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.