AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारण्यांकडून अपेक्षा नाहीत, साहित्यिकांनी मराठी भाषेची गोडी वाढवावी : राज ठाकरे

मराठी भाषेचं प्रेम हे वाचूनचं येईल, हे काम साहित्यिक, कवी यांनी मराठी भाषेबद्दल संस्कार केले पाहिजेत. महाराष्ट्रातील राजकारण्यांकडून अपेक्षा नाहीत, साहित्यिकांनी भाषा टिकावावी, गोडी लावावी,असं राज ठाकरे म्हणाले.

राजकारण्यांकडून अपेक्षा नाहीत, साहित्यिकांनी मराठी भाषेची गोडी वाढवावी : राज ठाकरे
राज ठाकरेImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 8:29 PM
Share

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात एका दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठी (Marathi) भाषा दिवस 365 दिवस साजरा करायला हवा, अशी भूमिका मांडली.आपल्याकडे ज्यावेळेला मोबाईल फोन आले त्यावेळेला इंग्रजी आणि हिंदी भाषा होत्या. त्यावेळेला एअरटेल आणि इतर कंपन्या होत्या, त्यावेळेला त्या कंपन्यांनी करणार नाही असं सांगितलं. त्या एअरची टेल खेचली, खळ खळ आवाज त्या कंपन्यांना ऐकू आले. त्या कंपन्यांनी काही दिवस लागतील असं सांगितलं.  मात्र, आम्ही त्यांना इतके दिवस दिले होते, काही केलं नाही, आजच्या आज हे ऐकू यायला हवं हे सांगितलं. त्यानंतर मराठी आवाज ऐकू यायला लागला,असं राज ठाकरे म्हणाले. जगामधील कोणीही महाराष्ट्रात  फोन करु देत त्याच्या कानी मराठीचा आवाज पडला पाहिजे नंतर बाकीच्या भाषा पडतील. आपण आपल्या भाषेबद्दल आग्रही असलं पाहिजे. देश आपला आहे हे मान्य आहे, एकोपा असला पाहिजे हे मान्य आहे. पण देशानं देखील आम्हाला मानलं पाहिजे. आपल्या भाषेवर आपण ठाम राहणं आवश्यक आहे. काही जण इंग्रजी भाषेतून मुलं शिकतात, असं म्हणतात. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक केरळमधल्या इंग्रजी भाषेतून शिकणाऱ्या लोकांनी त्यांच्या मातृभाषेबद्दल कडवट भूमिका घेतली. ते त्यांच्या भाषेसाठी उभे राहिले. कोणत्या भाषेत शिकता म्हणता ते महत्त्वाचं नाही, भाषेबद्दल प्रेम असणं, अभिमान असणं महत्त्वाचं आहे. भाषेसाठी भूमिका घेता का हे महत्त्वाचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

पाहा व्हिडीओ

मराठी भाषा मरेल हा टाहो का फोडला जातो

मराठी भाषेचं प्रेम हे वाचूनचं येईल, हे काम साहित्यिक, कवी यांनी मराठी भाषेबद्दल संस्कार केले पाहिजेत. महाराष्ट्रातील राजकारण्यांकडून अपेक्षा नाहीत, साहित्यिकांनी भाषा टिकावावी, गोडी लावावी,असं राज ठाकरे म्हणाले. उद्या कुसुमाग्रज यांच्या जंयतीनिमित्त मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतोय. आपण 365 दिवस मराठी भाषा दिवस साजरा करायला पाहिजे. मराठी भाषेचा जगात 10 वा क्रमांक लागतो. मराठी भाषा मरेल, असा टाहो का फोडला जातो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

एक दिवस मराठी दुसऱ्या दिवशी विसरायचं हे नको

एक दिवस मराठी मराठी म्हणून टाहो फोडायचा आणि विसरुन जायचं. आमचा हिंदू दंगलीत हिंदू असतो. दंगल संपली की तो भारतीय होतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भारतीय होतो. ते झालं की तो गुजराती, मराठी, बंगाली, तामिळ होतो. नंतर इतर दिवशी तो ब्राह्मण, मराठा, साळी, माळी होतो. आता आपण दिवस वाटून घेतले आहेत. आपल्याला एक ठेवणारी गोष्ट असेल तरी भाषा असेल. आपण हिंदी का बोलायला लागलो. मी, तुम्ही आपण सगळे हिंदी का बोलायला लागलो? आपण भारतातील गुजराती, तामिळ इतर भाषा का बोलत नाही. आपल्यावर ज्या प्रकारचा मारा झाला, हिंदी सिनेमा पाहत आलो त्याचा परिणाम असावा, असं राज ठाकरे म्हणाले,

वेगवेगळ्या माध्यमातून भाषा वाढवण्याचं काम करावं, चित्रपट कलावंत, दिग्दर्शक, साहित्यिक यांनी मराठी भाषा वाढवण्याचं काम करावं असं राज ठाकरे म्हणाले. मी पश्चिम बंगाल मध्ये गेलो तेव्हा त्यांच्या मंत्रालयातील लिफ्ट मध्ये मला किशोरकुमारची बंगाली गाणी ऐकू येत होती, आपल्या भाषेवर आपण ठाम राहील पाहिजे. तुमच्या भाषेबद्दल तुम्हाला अभिमान असला पाहिजे दिवाळी अंकाकडून हे संस्कार होणार आहेत. राजकारण्यांकडून अपेक्षा करता येणार नाही 365 दिवस मराठी भाषा दिवस साजरा झाला पाहिजे एक दिवसच का ? मराठी भाषा वृद्धिंगत करू, असं राज ठाकरे म्हणाले.

इतर बातम्या:

Equity Mutual Funds: सर्वोत्तम रिटर्नसाठी हवं प्रभावी प्लॅनिंग, मार्केट घसरणीवेळी काय करावं; जाणून घ्या

Russia Ukraine War : ‘शांततेसाठी कोणत्याही प्रकारे योगदान देऊ’; झेलेन्स्की यांच्या मदतीच्या मागणीनंतर पंतप्रधान मोदींचं आश्वासन

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.