BabaSaheb Purandare: ‘फडणवीस’ आडनाव कुठून आलं?; राज ठाकरेंनी सांगितला इतिहास

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (raj thackeray told story of Roots of fadnavis surname)

BabaSaheb Purandare: 'फडणवीस' आडनाव कुठून आलं?; राज ठाकरेंनी सांगितला इतिहास
राज ठाकरे, मनसेप्रमुख
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 1:43 PM

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज यांनी मीडियाशी संवाद साधताना बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत झालेल्या भेटींमधील किश्यांना उजाळा दिला. यावेळी राज यांनी थेट ‘फडणवीस’ हे आडनाव कुठून आलं? हे आडनाव कसं पडलं? याचा इतिहासच ऐकवला. (raj thackeray told story of Roots of fadnavis surname)

आपल्याकडे अनेक शब्द आहेत ते फारसी आहेत. पण ते आपल्याला माहीत नाहीत. अनेक आडनावं कशावरून आली हे माहीत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर हे ‘फडणवीस’ हे मुळात अडनाव नाही. ते मूळचं पर्शियन नाव आहे ‘फर्द नलीस’. ‘फर्द’ म्हणजे कागद, ‘नलीस’ म्हणजे लिहिणारा. म्हणजे ‘फर्द नलीस’. नंतर ते फडावर लिहिणं आलं. म्हणून ते फडणवीस आलं, असं राज यांनी सांगितलं. आडनावं कशी असतात? आडनाव कशी पडली? ती कुठून आली? यात मला रस आहे. हे कुठून आले? कसे आले? महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ कुठून आले? कसे आले? चपाती, पोळी कुठून आले? महाराष्ट्रात गहू नव्हता. मग गहू आला कुठून? अशा अनेक गोष्टी असतात त्या भूगोल आणि इतिहासाशी संबंधित असतात. बाबासाहेब या विषयावर माझ्याशी बोलले त्याबद्दल मी मला भाग्यवंत समजतो, असंही ते म्हणाले.

तेव्हाचे शब्द आता घ्यावेत का?

‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू’ हे शब्द म्हणजे तेव्हाची मराठी आहे. शब्द तेच आहेत. फक्त त्यात ळ किंवा ल मधला फरक आहे. ‘कैसी’ हा शब्द तिथे लिहिला ‘कैची’. तो तेव्हाचा मराठी शब्द आहे. तो आता घ्यावा का? आताच्या मराठीप्रमाणे ‘कैसी’ त्या संदर्भात लिहावा, याबाबत बाबासाहेबांशी मागच्या भेटीत बोललो होतो, असं राज यांनी स्पष्ट केलं.

हिंदुंनी कसं वागावं हेच बाबासाहेब सांगतात

परवा त्यांना भेटलो. ते म्हणाले, आनंदी आहे. पण समाधानी नाही. ते खरंच आहे. ज्या ज्या वेळी मी त्यांना भेटलो, त्या त्यावेळी नवीन खजाना भेटल्याचं मला प्रत्येकवेळी वाटलं. आपल्या छत्रपतींबद्दल अजून नवीन माहिती, इतिहासाबद्दल आणखी काही नवं बाबासाहेबांकडून आपल्याला ऐकायला मिळालं. मी लहानपणापासून त्यांची अनेक व्याख्याने ऐकली आहेत. शिवछत्रपतींचं चरित्रं अनेकदा वाचून झालं आहे. मी ज्या ज्यावेळी त्यांचं व्याख्यान ऐकली, आजही ऐकतो तेव्हा मला प्रत्येक वेळा वाटतं ते नुसतं शिवचरित्रं सांगत नाहीत. 2021मध्ये आपण कसं जगलं पाहिजे. कसं सावध असलं पाहिजे, म्हणजे या देशातील हिंदुंनी मराठी समाजाने किती सावध असलं पाहिजे, किती सतर्क असलं पाहिजे हे या इतिहासातून मला वाटतं बाबासाहेब सतत सांगण्याचा प्रयत्न सर्वांना करत आले. त्यातून तो बोध घेणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. (raj thackeray told story of Roots of fadnavis surname)

संबंधित बातम्या:

चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाही, बैल मुततो तशा भूमिका बदलत नाही: राज ठाकरे

BabaSaheb Purandare: बाबासाहेबांना जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो; राज ठाकरेंकडून गौरवोद्गार

Maharashtra News LIVE Update | बाबासाहेबांना भेटलो तेव्हा नवा खजिना मिळाला – राज ठाकरे

(raj thackeray told story of Roots of fadnavis surname)

फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.