AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत प्रवेश करताच धंगेकर यांचा आमदार हेमंत रासने यांच्यावर प्रहार, थेट कसब्यातील या मुद्यावरुन छेडले

ravindra dhangekar vs hemant rasane: कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मते घेतली. आता प्रत्यक्षात मात्र घरोघरी पाण्याचे मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे.

महायुतीत प्रवेश करताच धंगेकर यांचा आमदार हेमंत रासने यांच्यावर प्रहार, थेट कसब्यातील या मुद्यावरुन छेडले
ravindra dhangekarImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 15, 2025 | 3:54 PM
Share

Ravindra Dhangekar: गेल्या काही वर्षांपासून कसबा विधानसभा मतदार संघ चर्चेत आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ‘हु इज धंगेकर’ हा मुद्दा चर्चेत आला होता. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे हे वाक्य काँग्रेसने निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला होता. त्या पोटनिवडणुकीत भाजप उमदेवार हेमंत रासने यांचा पराभव करत रवींद्र धंगेकर निवडून आले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. काँग्रेसमध्ये असलेले रवींद्र धंगेकर महायुतीमधील शिवसेनेत मागील आठवड्यात आले. भाजप आणि शिवसेना महायुतीत कसबा पेठेत एका म्यानात दोन तलवारी झाल्या. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांनी थेट आमदार हेमंत रासने यांना लक्ष्य केले आहे.

महायुतीमधील वाद तीव्र

कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचे पहायला मिळत आहे. कसबा विधानसभेतील नागरिकांना पाण्याचे मीटर बसल्यावरुन त्यांनी लक्ष्य केले आहे. रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत आमदार हेमंत रासने यांना लक्ष्य केले आहे. यामुळे धंगेकर यांनी पक्षांतर केले असले तरी त्यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत असलेले जुने वाद मिटण्याऐवजी तीव्र झाल्याचे चित्र समोर आले आहे.

काय आहे बॅनरवर

माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मते घेतली. आता प्रत्यक्षात मात्र घरोघरी पाण्याचे मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. कसब्यातील सुज्ञ जनता त्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही, असे रवींद्र धंगेकर यांनी बॅनरवर लिहिले आहे.

रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदार संघात या आशयाचे फ्लेक्स लावले आहे. ते आता महायुतीतील मित्र पक्षात आहे. मात्र विद्यमान आमदार हेमंत रासने यांना धंगेकर लक्ष करीत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे पुण्यात महायुतीमधील तिन्ही पक्षात म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वर्चस्वाची लढाई वाढणार आहे.

रवींद्र धंगेकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. त्यानंतर त्यांचे महायुतीमधील घटकपक्ष भाजपसोबत मतभेद कायम असल्याचे संदेश जात आहे. आता हे वाद मिटतील का? याबाबत शंका उपस्थित होत आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.