“टिळक परिवाराला उमेदवारी द्यायला तयार; पण,…” चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

लोकं कल्लोळ करत आहेत की टिळक कुटुंबीय नाराज आहेत. पण कोणीही नाराज नाही. पक्षामध्ये कधीही जाणीवपूर्वक कोणालाही डावलण्यात येत नाही. पत्नी किंवा आई गेल्यामुळे वाईट वाटणारच.

टिळक परिवाराला उमेदवारी द्यायला तयार; पण,... चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 9:12 PM

पुणे : कसब्यातून भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळं ही जागा मुक्ता टिळक यांचे पती किंवा मुलगा यांना मिळण्याची दाट शक्यता होती. पण, मेरीटच्या आधारावर हेमंत रासने यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले, दोन तारखेला शैलेश टिळक (Shailesh Tilak) आणि कुणाल माझ्याकडे भेटीसाठी आले होते. टिळक कुटुंबीय कधीच नाराज होऊ शकत नाही. मुक्ताताई आमच्या नेत्या होत्या.

लोकं कल्लोळ करत आहेत की टिळक कुटुंबीय नाराज आहेत. पण कोणीही नाराज नाही. पक्षामध्ये कधीही जाणीवपूर्वक कोणालाही डावलण्यात येत नाही. पत्नी किंवा आई गेल्यामुळे वाईट वाटणारच. काही गोष्टींचे मेरीट असते. कसबा आणि चिंचवडची परिस्थिती वेगळी आहे. कुणाल, बिडकर, घाटे हे सगळे उमेदवार कॅपेबल होते. पण एका जागेवर एकच जण लढू शकतात, असंही बावनकुळे म्हणाले.

वर्षभरासाठी निवडणूक लादू नये

उद्या तीन वाजतापर्यंत महाविकास आघाडीने जर ही निवडणूक बिनविरोध केली तर आम्ही उद्या हेमंत रासने यांचे तिकीट मागे घेऊ. नाना पटोले यांनी विनंती आहे की, उद्या निवडणूक लादू नये. एक वर्ष लोकांना निवडणुकीसाठी पाठवू नये, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

…तर टिळक परिवाराला उमेदवार देऊ

मागच्या वेळेस शरद पवार म्हणाले, सगळे इतर नेते म्हणाले म्हणून आम्ही अंधेरीची निवडणूक बिनविरोध केली, याची आठवणही चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून दिली. ते म्हणाले, आमची कागदपत्र तयार आहेत. फॉर्म तयार आहेत. टिळक परिवाराला आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहोत. पण त्यांच्याकडून (महाविकास आघाडी) तसे येऊ द्या.

काही लोकांची जाणीवपूर्वक बॅनरबाजी

चिंचवडमध्ये आम्ही फॉर्म भरला आहे. पण अजूनही संवाद नाही. कोणीही भाजपचा उमेदवार असो टिळक, घाटे, रासने, बिडकर असो १०० टक्के निवडून येतील. कोणालाही डावलण्याचा प्रयत्न नाही, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. अनेक ठिकाणी ज्यांच्या घरी दिवंगत नेते गेले आहेत त्यांना तिकीट दिले नाही. १०० टक्के कोणाचीही नाराजी नाही. काही लोकं जाणीवपूर्वक बॅनरबाजी करत आहेत, असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला. नाना पटोले उद्यापर्यंत काय निर्णय घेतात, यावर ही निवडणूक कशी होते, हे स्पष्ट होईल.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.