Pune Leopard : …अन् असा केला बिबट्याच्या पिल्लाचा बचाव; पाहा, पुण्यातल्या डुंबरवाडी शिवारातला ‘हा’ Exclusive Video

पिल्लू आणि त्याच्या आईचे यशस्वीरित्या पुन्हा भेट घडवण्यात वनविभागाला यश आले आहे. मागील 2 महिन्यात हे पाचवे यशस्वी ऑपरेशन ठरले आहे. वनविभागाने बिबट्याच्या पिल्लाचे रक्षण केले खरे मात्र प्राणघातक ठरणाऱ्या बिबट्यांना वनविभागाने जेरबंद करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

Pune Leopard : ...अन् असा केला बिबट्याच्या पिल्लाचा बचाव; पाहा, पुण्यातल्या डुंबरवाडी शिवारातला हा Exclusive Video
मादी बिबट्या आणि पिल्लाची भेट
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 5:09 PM

जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील ओतूर जवळच्या डुंबरवाडी शिवारात बिबट्याचे पिल्लू (Leopard cubs) आढळून आले आहे. ऊसाची तोडणी सुरू असताना अचानक बिबट्याचे हे पिल्लू आढळून आले. तर ओतूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक हे रेस्क्यू ऑपरेशन (Rescue operation) करत संबंधित पिल्लू आणि मादीचे मिलन करून दिले आहे. टीव्ही 9कडे याचा एक्सक्लुसिव्ह असा व्हिडिओ उपलब्ध आहे. येथील शेतकरी बाळासाहेब विठ्ठल डंबरे यांच्या शेतात ऊस तोडणी दरम्यान बिबट्याचे पिल्लू आढळून आले. मादी जातीचे अंदाजे 2 महिने वयाचे हे पिल्लू आहे. सायंकाळी रेस्क्यू टीमने कॅमेरा (Camera) लावून पिल्लू मादीच्या भेटीसाठी ठेवले. मादी तेथे फिरून गेली परंतु पिल्लाला नेले नाही. 3, 4 दिवसांनंतर मादी आपल्या पिल्लाला आपल्यासोबत घेऊन गेली.

पाचवे यशस्वी ऑपरेशन

पिल्लू आणि त्याच्या आईचे यशस्वीरित्या पुन्हा भेट घडवण्यात वनविभागाला यश आले आहे. मागील 2 महिन्यात हे पाचवे यशस्वी ऑपरेशन ठरले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात एकीकडे बिबट्याची पिल्ले अशी आढळत असताना दुसरीकडे बिबट्या मात्र अनेक ठिकाणी धुमाकूळ घालत आहेत. कालच दौंड तालुक्यातील दहिटणे येथील शिंदेमळा परिसरातील मेंढपाळांच्या पालावर भर दिवसा बिबट्याने हल्ला करून सुमारे 26 मेंढ्यांचा फडशा पाडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

‘प्राणघातक बिबट्यांना जेरबंद करावे’

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढत असताना गणेगावात धनंजय तिखोळे या मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याने शिकारीसाठी हल्ला केला. या हल्ल्यात सहा मेंढ्या मारल्या गेल्या. तर शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे बिबट्याने तीन वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले होते. दरम्यान, वनविभागाने बिबट्याच्या पिल्लाचे रक्षण केले खरे मात्र प्राणघातक ठरणाऱ्या बिबट्यांना वनविभागाने जेरबंद करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.