छोट्याशा बिबट्याची डरकाळी ऐकली का? Cute video होतोय Viral

छोट्याशा बिबट्याची डरकाळी ऐकली का? Cute video होतोय Viral
बिबट्याचं पिल्लू
Image Credit source: Youtube

Baby Jaguar video : एक थोडा वेगळा व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. बिबट्याच्या (Leopard) पिल्लाचा हा व्हिडिओ आहे. बिबट्या हा जंगली प्राणी असला, तरी त्याची पिल्ले मात्र फारच गोड असतात. एका पिंजऱ्यात बिबट्याचे एक पिल्लू आहे. हे पिल्लू अत्यंत गोंडस दिसत आहे.

प्रदीप गरड

|

Mar 18, 2022 | 7:30 AM

Baby Jaguar video : प्राण्यांचे व्हिडिओ आपल्या सर्वांनाच आवडतात. तेच जर लहान असतील तर मग अधिकच आकर्षक वाटतात. पाळीव प्राण्यांचे बोलायचे झाल्यास कुत्रा, मांजर हे आपल्या सर्वात जवळचे असतात. अनेक जण त्यांच्यात रमतात. त्यांची पिल्ले तर त्यांच्यापेक्षा गोंडस असतात. त्यामुळे आपला दिवसही मजेत जातो. मात्र जंगली प्राणी माणसांसोबत खेळायला लागली तर? होय… असे अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो. कुणी गेंड्यासोबत खेळते. तर कुणी सिंहांच्या कळपासोबत फिरते तर कुणी तरसाला गोंजारते. असे व्हिडिओही चांगलेच व्हायरल होतात. कारण ते इतरांपेक्षा वेगळे असतात. आताही एक असाच पण थोडा वेगळा व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. बिबट्याच्या (Leopard’s cub) पिल्लाचा हा व्हिडिओ आहे. बिबट्या हा जंगली प्राणी असला, तरी त्याची पिल्ले मात्र फारच गोड असतात.

चघळतो बोट

व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे, की एका पिंजऱ्यात बिबट्याचे एक पिल्लू आहे. हे पिल्लू अत्यंत गोंडस दिसत आहे. पण ते एका व्यक्तीचे बोट चघळत आहे. ती व्यक्तीही न घाबरता त्या बिबट्याच्या तोंडात आपले बोट बिनधास्तपणे देत आहे. बिबट्याचे पिल्लू खेळण्यात आणि मस्ती करण्यात दंग आहे. एक छोटा पिंजरा त्याच्यामध्ये त्याची मस्ती सुरू आहे. त्याचा गोड आवाजही आपल्याला चांगलाच भावतो.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर क्यूट क्रिएचर्स ग्रेट अॅण्ड स्मॉल (Cute Creatures Great And Small) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. Baby Jaguar (Cub) Chews Finger Then “Roars” a Baby Roar अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला आहे. जवळपास 6,862,185+ व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ पाहा…

आणखी वाचा :

पत्र देण्यासाठी गेली अन् हरिणांनी रोखला मार्ग, मेलवाहकास आला मजेशीर अनुभव; पाहा Video

संगीत खुर्ची नाही तुफान आहे हे! चक्रीवादळाच्या तडाख्यानं हवेत उडाल्या खुर्च्या, Video viral

तरुणीचं धाडस! सापाला उचलून रस्त्याच्या कडेला सोडलं, Video viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें