AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडून महेश लांडगे यांना धक्का, काही महिन्यात काढली ही जबाबदारी

Pune News : भारतीय जनता पक्षाने मिशन २०२४ ची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी भाजपकडून समन्वयक नेमले गेले आहे. प्रत्येक मतदार संघावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही योजना भाजपने तयार केली आहे.

भाजपकडून महेश लांडगे यांना धक्का, काही महिन्यात काढली ही जबाबदारी
mahesh landge
| Updated on: Aug 04, 2023 | 8:50 AM
Share

प्रदीप कापसे, पुणे | 4 ऑगस्ट 2023 : भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. आता या ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या निधनानंतर अजूनही पोटनिवडणूक जाहीर झाली नाही. यामुळे भाजपने मिशन 2024 ची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी लोकसभा मतदार संघानुसार जबाबदारी निश्चित केली गेली आहे. या प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाचे नेते महेश लांडगे यांना धक्का दिला आहे.

काय केले बदल

पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक भाजपकडून नेमले आहे. पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिली होती. त्यानंतर शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे दिली. तसेच जून महिन्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली होती. परंतु आता शिरुरची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडून काढून घेतली आहे. आता ही जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे दिली आहे.

कोण आहेत राजेश पांडे

राजेश पांडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये आले आहेत. अभविपचे प्रदेशाध्यक्ष ते होते. त्यावेळी अभिविपचे संघटन त्यांनी मोठ्या कौशाल्याने सांभाळले होते. आता भाजपचे ते उपाध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. पुणे विद्यापीठ आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राधिकरणावर त्यांनी काम केले आहे.

राजेश पांडे यांच्यावर आणखी एक जबाबदारी

राजेश पांडे यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून मांडलेली ‘मेरी माटी, मेरा देश’ या देशव्यापी अभियानाची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. या अभियानाच्या संजोयकपदी राजेश पांडे यांना नेमले आहे. देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वानिमित्ताने मेरी माटी मेरा देश हा उपक्रम साकरला जात आहे.  या उपक्रमाची महाराष्ट्राची जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे दिली गेली आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.