Pune MNS clash : पुणे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांची झटापट, मनसेतला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असून कुठल्याच बैठकांना का बोलावत नाहीत, याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे धावून गेले. त्यानंतर त्यांच्याच झटापट झाली. मात्र, आमच्यातील वैयक्तिक कारणामुळे किरकोळ बाचाबाची झाल्याचे शिरोळे यांचे म्हणणे आहे.

Pune MNS clash : पुणे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांची झटापट, मनसेतला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांत झटापट
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

May 19, 2022 | 10:29 AM

पुणे : पुणे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये झटापट (Pune MNS clash) झाली आहे. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांच्यात ही झटापट झाली. रणजित शिरोळे (Ranjit Shirole) विभाग अध्यक्ष असून कुठल्याच बैठकांना का बोलावत नाहीत, याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे धावून गेले. त्यानंतर त्यांच्याच झटापट झाली. मात्र, आमच्यातील वैयक्तिक कारणामुळे किरकोळ बाचाबाची झाल्याचे शिरोळे यांचे म्हणणे आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर होते. त्यांची पुण्यात सभाही होणार होती, मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरे पुण्याहून मुंबईकडे निघताच आता मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

व्हिडिओही व्हायरल

पुण्यात मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात हा राडा झाला. काल रात्री मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात गोंधळाला सुरुवात झाली. आणि त्याचे रुपांतर हमरी तुमरीत झाले. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर आणि शिरोळे यांच्यात वादाला सुरुवात झाली. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष आहेत. मात्र पक्षाच्या कोणत्याही बैठकांना आपल्याला बोलावले जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे संतापले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. यातून कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि राड्याला सुरुवात झाली. पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोरच हा वाद झाला.

राज ठाकरे-वसंत मोरे भेट नाहीच

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यापूर्वी पुण्यात ते सभा घेणार होते. डेक्कन भागातील भिडे पुलाजवळील नदी पात्रात ही सभा होणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी या सभेसाठी तयारीही सुरू केली होती. मात्र अचानक त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. ठाकरे यांच्या तब्येत बिघडल्याने सभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज ठाकरे पुण्यातून गेल्यानंतर कार्यकर्त्यांत राडा झाला. तर मनसेचे नेते वसंत मोरे यांची राज ठाकरे यांच्याशी भेटही होऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेतला बेबनाव उघड झाला आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें