पिंपरीत क्रूरतेचा कळस, कुत्र्याला इमारतीवरुन फेकून ठार मारलं

पिंपरीत क्रूरतेचा कळस, कुत्र्याला इमारतीवरुन फेकून ठार मारलं

पिंपरी चिंचवडमध्ये एका भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये.

Akshay Adhav

|

Dec 16, 2020 | 7:50 PM

पुणे : माणूस किती क्रूर वागू शकतो, याचं उदाहरण पुण्यातील पिंपरीत पाहायला मिळालं. पिंपरी चिंचवडमध्ये एका भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. पिंपळे गुरव येथील चंद्ररंग कॉर्नर इमारतीत ही घटना 12 डिसेंबरला घडली. (Brutality in Pimpri the dog was thrown from the building and killed)

पुण्यात भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून दिलंय, हे वृत्त कळाल्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री आणि विद्यमान खासदार मनेका गांधींनी पोलिसांना फोन करत, अज्ञाताला अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

थेट मनेक गांधींचा फोन आल्यानंतर पोलिसांनीही तपासाचीही चक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. खासदार मनेका गांधींनी स्वत: याप्रकरणात लक्ष घातलंय. कुत्र्याला इमारतीवरून फेकणाऱ्या अज्ञाताला तातडीनं अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.

(Brutality in Pimpri the dog was thrown from the building and killed)

हे ही वाचा

तोंडावर वार, एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या वडिलांची हत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें