सांगलीत लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच बैलबाजार फुलला; खिलार बैलाला ‘इनोव्हा’ एवढी किंमत!

लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सांगलीत बैल बाजार भरला आहे. (sangli cattle market creates record with sales worth Rs 7 Cr)

सांगलीत लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच बैलबाजार फुलला; खिलार बैलाला 'इनोव्हा' एवढी किंमत!
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 12:35 PM

सांगली: लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सांगलीत बैल बाजार भरला आहे. त्यामुळे बैल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली आहे. विशेष म्हणजे या बाजारात अत्यंत जातीवंत बैल विक्रीसाठी आले असून त्याला मोठी किंमतही लागली आहे. एका खिलार बैलाला इनोव्हा एवढी किंमत आल्याने सध्या खुरसुंडीचा खिल्लार जनावर बाजार चर्चेत आला आहे. (sangli cattle market creates record with sales worth Rs 7 Cr)

सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे भरणारी पौष यात्रा ही महाराष्ट्रामध्ये जातिवंत आणि नामवंत खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभर सर्व यात्रा बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची खरेदी-विक्री होत नव्हती. मात्र आता सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने covid-19 ते सर्व नियम पाळून खरसुंडीतील बैलबाजार हा भरवण्यात आलेला आहे. बैल बाजार भरवण्यात आला असला तरी खरसुंडीमधील पौशी यात्रा कोरोनामुळे भरू शकली नाही. परंतु, लॉकडाऊननंतर भरणाऱ्या पहिल्याच बैल बाजाराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे खरसुंडीचा खिल्लार जनावर बाजारात सुमारे 6 ते 7 कोटींची उलाढाल झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

20 हजार जातीवंत खिलार बैलांची आवक

पौर्णिमेला शेळ्या मेंढ्यांच्या बाजाराने यात्रेला सुरूवात होते. यात्रेमध्ये यात्रेसाठी शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी घेऊन येत असतात आणि मोठ्या प्रमाणावर विविध राज्यातून व्यापारी येत असतात. यंदा यात्रा गावाच्या शेजारी न भरता खरसुंडीच्या दक्षिणेस गावाच्या बाहेर भरली आहे. मुबलक जागा असल्याने यात्रा मोठ्या प्रमाणावर भरली. लाखोरुपये किमतीच्या अनेक बैलांबरोबरच तब्बल 20 हजार जातिवंत खिलार बैलांची आवक यात्रेमध्ये झालेली आहे.

इनोव्हाच्या किंमती एवढा बैल

यात्रेमध्ये 16 लाख रुपये किमतीचा बैल आकर्षणाचा विषय ठरला आहे. या बैलाची किंमत इनोव्हा एवढी असल्याने हा बैल सध्या बाजारातील सर्वात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. यात्रेमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मार्केट कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने लाईट आणि पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. (sangli cattle market creates record with sales worth Rs 7 Cr)

संबंधित बातम्या:

नांदेडच्या शेतकऱ्याची काळ्या गव्हाची लागवड, मार्केटमध्येही मोठी मागणी, भावही जास्त, मधुमेहींसाठी आरोग्यदायी पर्याय, वाचा सविस्तर

Special Story : महिलांना सरपंचपदासोबत अधिकार मिळाले, पण गावातील इतर हस्तक्षेपांचं काय?

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी नागरिकांची गर्दी; कामाची पद्धत कशी?

(sangli cattle market creates record with sales worth Rs 7 Cr)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.