Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आणि पालखीबरोबरच्या साहित्याची जुळवाजुळव; वाचा, कशी सुरूय तयारी…

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग गेले काही दिवस आळंदी मध्ये पाहायला मिळत आहे. या तयारीमधील एक मुख्य भाग म्हणजे पालखी रथाबरोबर जाताना माऊलींच्या आरतीचे सामान, चांदीचे दागिने, वस्त्र या सर्वाचे व्यवस्थापन... ते व्यवस्थापन पूर्ण झाले आहे.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आणि पालखीबरोबरच्या साहित्याची जुळवाजुळव; वाचा, कशी सुरूय तयारी...
पालखी प्रस्थान सोहळ्याची आळंदीत तयारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 5:10 PM

पुणे : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) प्रस्थान सोहळ्याची रूपरेषा तयार झाली आहे. पहाटे 4 पासून प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. घंटानाद, काकडा यासह विविध धार्मिक विधी पार पाडले जातील. दुपारी अडीचला 47 दिंड्या मंदिरात येणार असून 4च्या सुमाराला पालखी प्रस्थान होणार आहे, अशी माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर (Dnyaneshwar Veer) यांनी दिली आहे. 21 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या आळंदीत लगबग सुरू झाली आहे. वारी 9 जुलैला पंढरपुरात (Pandharpur) पोहोचणार आहे. आषाढी एकादशी 10 जुलैला आहे. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त आळंदीत वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. आळंदी संस्थानासोबतच वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. 21 जूनच्या प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये माऊलीच्या रथाची चाचणीही नुकतीच घेण्यात आली होती.

पालखीबरोबरच्या साहित्याची जमवाजमव

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग गेले काही दिवस आळंदी मध्ये पाहायला मिळत आहे. या तयारीमधील एक मुख्य भाग म्हणजे पालखी रथाबरोबर जाताना माऊलींच्या आरतीचे सामान, चांदीचे दागिने, वस्त्र या सर्वाचे व्यवस्थापन… ते व्यवस्थापन पूर्ण झाले आहे. पालखीबरोबर मंदिर समितीचे जवळपास 300 लोक असतात. त्यांच्यासाठी अगदी सुईपासून तंबू, जेवण आणि संपूर्ण साहित्याची तयारी करण्यात आली आहे.

‘केवळ 80 रुपयांत ज्ञानेश्वरी’

संस्थानातर्फे गॅस शेगडी, सुईधागे यासह स्वयंपाकासाठीची जी मोठमोठी भांडी आहेत, त्याची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून ही तयारी सुरू करण्यात आल्याचे व्यवस्थापक श्रीधर नाईक यांनी सांगितले. तर घरोघरी ज्ञानेश्वरी पोहोचावी, म्हणून केवळ 80 रुपयांत ती देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास सर्वच तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनीच वारीत सहभागी व्हावे’

श्रींच्या रथापुढील 27 आणि रथामागील 20 अशा 47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी चारपासून प्रस्थान सोहळा सुरू होणार असून मानकरी, सेवेकरी आणि दिंडी प्रमुख यांचा सन्मान होऊन सहा-साडेसहापर्यंत पालखीचे प्रस्थान होईल, असे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनीच वारीत सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Non Stop LIVE Update
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.