मोठी बातमी! पुण्याच्या तीन तालुक्यांमध्ये सरपंच निवडी लांबणीवर, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

मोठी बातमी! पुण्याच्या तीन तालुक्यांमध्ये सरपंच निवडी लांबणीवर, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

बारामती, शिरूर आणि खेड तालुक्यातील सरपंच-उपसरपंचपदाची निवड 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे (selection of sarpanch postponed in three talukas of Pune)

चेतन पाटील

|

Feb 08, 2021 | 11:11 PM

पुणे : बारामती, शिरूर आणि खेड तालुक्यातील सरपंच-उपसरपंचपदाची निवड 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. संरपचपादाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने या तीनही तालुक्यातील निवडींना स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.(selection of sarpanch postponed in three talukas of Pune).

पुणे जिल्ह्यातील एकूण 746 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्या सभेमध्ये सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 9 आणि 10 फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंदाची निवड होणार आहे. मात्र, खेड तालुक्यातील भोसे, बारामती तालुक्यातील निंबुत आणि शिरुर तालुक्यातील शिक्रापूर या ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली.

या याचिकेच्या सुनावणीअंती उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना 9 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता सुनावणीसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर बारामती, शिरूर आणि खेड तालुक्यात 9 आणि 10 फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंदाची निवड न करता ही निवड प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2021 पर्यंत स्थगित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत (selection of sarpanch postponed in three talukas of Pune).

9 तालुक्यांमध्ये सरपंचपदाची निवड उद्या आणि परवा

दरम्यान, पुण्यातील खेड, शिरुर आणि बारमती वगळता इतर 9 तालुक्यांमधील ग्रामपंचायतींमधील सरपंच-उपसरपंचपदाची निवड 9 आणि 10 फेब्रुवारीला करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या 9 तालुक्यांमध्ये हवेली, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, दौड, जुन्नर, आंबेगाव आणि पुरंदर यांचा समावेश आहे.

सरपंचपदाचे आरक्षण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 30 (5) आणि मुंबई (सरपंच आणि उपसरपंचः निवडणूक नियम 1964 मधील नियमानुसार तालुकानिहाय काढण्यात आले आहे.

हेही वाचा : महिला सदस्याची आधी बिनविरोध निवड, निकालानंतर गायब, सरपंच निवडीच्या दिवशी हजर, ग्रामस्थांकडून मारहाण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें