लोकांसाठी झटणाऱ्यांना जनता कधीही विसरत नाही; शरद पवारांचा कानमंत्र

| Updated on: Jan 23, 2021 | 10:56 AM

समाजातील शेवटच्या माणसापर्यंत बांधिलकी बाळगा. लोकांसाठी झटा. लोकांसाठी झटल्यास तेही तुम्हाला कधीच विसरत नाहीत, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वो शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. (sharad pawar address to party workers)

लोकांसाठी झटणाऱ्यांना जनता कधीही विसरत नाही; शरद पवारांचा कानमंत्र
Follow us on

पुणे: समाजातील शेवटच्या माणसापर्यंत बांधिलकी बाळगा. लोकांसाठी झटा. लोकांसाठी झटल्यास तेही तुम्हाला कधीच विसरत नाहीत, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वो शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. ते पुण्यात बोलत होते. (sharad pawar address to party workers)

शरद पवार यांच्या हस्ते वारजे येथे 45 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी त्यांनी खडकवासला परिसरातील आठवणींना उजाळा देतानाच कार्यकर्त्यांना मोलाचा सल्लाही दिला. जनतेसाठी जो झटतो, त्याला लोक कधीही विसरत नाही. त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत बांधिलकी ठेवा, असं ते म्हणाले. तरुणांनी 45 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं चांगलं काम केलं आहे. राष्ट्रध्वज प्रत्येक देशाच्या अभिमानाचं प्रतिक असतं. आपला तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या अभिमानाचं प्रतिक आहे, असं त्यांनी सांगितलं.

तरुण पुढे येत आहेत

खडकवासला परिसरात मला एकेकाळी प्रचंड मते मिळायची. माझ्याकडे तेव्हा राज्याची आणि राज्याबाहेरची जबाबदारी असायची. त्यामुळे खडकवासला परिसरात प्रचाराला यायला वेळ मिळायचा नाही. त्यामुळे केवळ दोन तास जरी या भागात प्रचाराला आलो तरी विक्रमी मते मिळायची, अशी आठवण त्यांनी सांगितलं. पूर्वी खडकवासलातील प्रत्येक गावात स्थानिक नेतृत्व असायचं. गावात एकोपा होता. गाव कुटुंबासारखं राह्यचं. आता गावामध्ये आलो तर कुठे आलो हे कळत नाही. शेती उद्ध्वस्त झाली. सोसायट्या आल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक इथे येऊन राहत आहेत, असं सांगतानाच आता गावातील तरुण गावाच्या विकासासाठी पुढे येत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. हा परिसर बदलतोय. तो नीटनेटका राहावा, असंही ते म्हणाले. (sharad pawar address to party workers)

 

संबंधित बातम्या:

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुतण्याला ईडीकडून अटक; पीएमसी घोटाळा भोवणार?

Balasaheb Thackeray Statue | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, राज-उद्धव एकाच व्यासपीठावर

मायबापाची जबाबदारी टाळली तर थेट 30 टक्के पगार कपात, औरंगाबाद झेडपीचा निर्णय!

(sharad pawar address to party workers)