AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: संभाजी भिडे ते गोविंद देवगिरी , वारकरी संप्रदायातील ते प्रतिगामी घुसखोर कोण? राष्ट्रवादीच्या त्या बॅनरने राज्यात खळबळ

Sharad Pawar NCP Published Banner on Infiltrators: राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात गेल्या काही वर्षांपासून कट्टर हिंदुत्ववादी हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा विचार मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसने आता त्या 40 प्रतिगाम्यांचा नावासह फोटो जाहीर केला आहे. त्या बॅनरमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar: संभाजी भिडे ते गोविंद देवगिरी , वारकरी संप्रदायातील ते प्रतिगामी घुसखोर कोण? राष्ट्रवादीच्या त्या बॅनरने राज्यात खळबळ
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस बॅनरImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 24, 2026 | 12:52 PM
Share

Sharad Pawar NCP Published Banner on Infiltrators: राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील प्रतिगाम्यांविरोधात तुतारी फुंकली आणि सामाजिक, धार्मिक क्षेत्र ढवळून निघाले. वारकरी संप्रदाय गेल्या काही वर्षांपासून कट्टर हिंदुत्वादी हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा विचार त्यांनी मांडला. त्याचवेळी या प्रतिगाम्यांविरोधात मोठी चळवळ उभारण्याचे संकेतही दिले. धर्मांध लोकांची, प्रतिगामी लोकांची यादी तयार करून महाराष्ट्रासमोर आणण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्या 40 प्रतिगाम्यांचा नाव आणि फोटोच जाहीर केले आहेत. याविषयीच्या बॅनरने एकच खळबळ उडाली आहे.

वारकरी संप्रदायातील ते घुसखोर कोण?

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा लेख प्रसिद्ध झाला होता त्या लेखात वारकरी संप्रदाय मधे प्रतिगामी लोकांनी घुसखोरी केली आहे असा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या सगळ्या टीका टिप्पणी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय मधे घुसखोरी करणाऱ्या लोकांची यादी प्रसिद्ध केली होती.

आता या घुसखोरांचे बॅनर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांनी लावले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी च्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बिलार्ड पीअर येथील कार्यालयाच्या बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेल चे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात नवीन वादाला तोंड फुटणार हे निश्चित आहे.

राष्ट्रवादीच्या बॅनरवर कुणाचा फोटो आणि नाव?

राष्ट्रवादीने प्रकाशित केलेल्या बॅनवर किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी, गौतम खट्टर, संभाजी भिडे गुरूजी, संग्राम भंडारे, तुषार भोसले, अक्षय भोसले, प्रकाश जवंजाळ, एकनाथ सदगीर, ज्ञानेश्वर जळकीकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज, संजय नाना धोंडगे, राणा वासकर, चंद्रशेखर देगलूरकर, उदबोध पैठणकर, किशोर शिवणीकर, रामगिरी महाराज, शाम राठोड, निरंजन कोटेकर यांचा समावेश आहे. याशिवाय इतर जणांचाही लवकरच चेहरा समोर आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Follow Us
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी