AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांकडून साताऱ्याच्या पावसातील सभेची आठवण; म्हणाले, पावसाचं आणि माझं नातं

Sharad Pawar on Satara Pawasatali Sabha : शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. या दौऱ्या दरम्यान शरद पवार विविध ठिकाणी भेटी देत आहेत. यावेळी शरद पवारांनी साताऱ्याच्या सभेची आठवण सांगितली. निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. शरद पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

शरद पवारांकडून साताऱ्याच्या पावसातील सभेची आठवण; म्हणाले, पावसाचं आणि माझं नातं
शरद पवारImage Credit source: ANI
| Updated on: Jun 13, 2024 | 8:19 PM
Share

साताऱ्यातील पोटनिवडणुकीत शरद पवारांची जाहीर सभा सुरु होती. यावेळी अचानकपणे पाऊस आला. त्या भरपावसात शरद पवार यांनी सभेला संबोधित केलं. त्यांच्या या सभेची सर्वत्र चर्चा झाली. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा या गावाला त्यांनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी साताऱ्यातील सभेची आठवण करून दिली. दुष्काळ पाहायला आलो अन् पाऊस सुरू झाला आहे. पावसाचा अन् माझ नातं काय आहे, माहिती नाही. पाच वर्षापूर्वी सातारा मध्ये सभेत पाऊस पडला, असं शरद पवार म्हणाले.

दुष्काळावर काय म्हणाले?

निवडणुका झाल्या माझ्या लक्षात आल राज्यात काही ठिकाणी दुष्काळ आहे. तेव्हा ठरवलं काही भागात जाऊन लोकांशी बोलावं,अडचणी जाणून घ्याव्या. एवढा पाऊस पुरेसा नाही. काही ठिकाणी गाळ आहे. साठवण क्षमता कमी आहे. राज्य सरकारचं पाटबंधारे खात याची बैठक घेऊन सोडविणार आहे. जर यांनी नाही केलं तर चार महिन्यांनी सरकार बदलायचं आहे. मग काम कशी होत नाहीत मग बघतो, असं शरद पवार म्हणाले.

राज्यकर्ते योग्य रितीने बघत नाहीत. चार महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपलं काम चोख करा. तुम्ही सगळे करून दाखवा. तिथं ही तुतारी वाजवा. तुम्ही सगळे साथ द्यायला खात्री आहे. राज्यात बदल होत आहे. त्यात महिलांचा वाटा जास्त आहे. आता ही महिलांची उपस्थिती अधिक आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंना तुम्ही लीड दिलं. त्यांना इकडे यायची ईच्छा होती. पण त्यांना मुलाच्या पदवीदान समारंभला उपस्थितीत राहिल्या आहेत. 14 निवडणुका लढलो. एक निवडणूक वगळता सगळ्या इथं लढलो. पण तुम्ही कधी मला घरी पाठवलं नाही. यावेळी देशात नाही जगात बारामती लोकसभा निवडणूक चर्चिली गेली. बारामती लोकसभा मतदासंघांत विक्रम तुम्ही केला. लोकशाही सामान्य लोकांमुळे टिकली आहे, असं शरद पवार यांनी दौंडमध्ये बोलताना म्हटलं आहे.

‘भटकती आत्मा’ विधानावर प्रतिक्रिया

मला म्हटले की, भटकती आत्मा.. तर मी म्हटलं आता मी तुम्हाला सोडणार नाही. मी अशा वेळी बाहेर पडलो की पाऊस पडतो, पाऊस सुरू आहे. पाणी प्रश्न साठी मी राज्य सरकारशी वेळ घेऊन या कामाबद्दल निघतोय का बघणार आहे. मी ठरवले आहे चार महिन्याने राज्य हातात घ्यायचं. तुम्ही साथ द्या. आपण एकत्रित राहू या सगळ्या दुष्काळी भागाच दुखणं कमी करण्यासाठी प्रयत्न करू, असं पवारांनी म्हटलंय.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.