पिंपरी-चिंचवड : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या होम ग्राऊंडवर पुण्यात जाऊन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. तसंच महाविकास आघाडी आहे. सगळ्यांना थोडं मिळालं पाहिजे. या न्यायाने पुणे आणि पिंपरीत सेनेचा महापौर झाला पाहिजे, अशी आमची इच्छा असेल तर चुकलं कुठे, असा सवालही त्यांनी विचारला.