AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad : आम्ही संभाजीराजे छत्रपतींसोबत, पुण्यातल्या कार्यकर्त्यांची भावना; शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे रवाना

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून तर माघार घेतली आहे. मात्र स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत राहणार आहेत. याद्वारे जनतेशी संवाद साधून त्याप्रमाणे पुढील वाटचाल करणार आहेत.

Raigad : आम्ही संभाजीराजे छत्रपतींसोबत, पुण्यातल्या कार्यकर्त्यांची भावना; शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे रवाना
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर करण्यात आलेली रोषणाईImage Credit source: Facebook
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jun 05, 2022 | 9:53 AM
Share

पुणे : 6 जूनच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पुण्यातून कार्यकर्ते रायगडला (Raigad) निघाले आहेत. उद्या रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ हे कार्यकर्ते रवाना होत आहेत. संभाजीराजे छत्रपती जी कोणती भूमिका घेतील ती आमची भूमिका असेल, संभाजीराजेंवर (Sambhajiraje Chhatrapati) अन्याय झाला आहे. त्यांना खासदारकी मिळायला हवी, आम्ही संभाजीराजेंसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करत आपण राज्यसभेसाठी (Rajya Sabha) अपक्ष उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन राज्यसभेवर पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. नंतर शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र पक्षप्रवेशाची अट घातल्याने अखेर तो पर्यायही बंद झाला.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

रायगडावर उद्या म्हणजेच सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. याची जय्यत तयारी सुरू आहे. संभाजीराजे छत्रपती हेदेखील याठिकाणी येणार आहेत. यासंबंधी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की दुर्गराज रायगडवर 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गडावर अन्नछत्र चालू असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह , याचबरोबर निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी समितीचे पदाधिकारी आहोरात्र झटत आहेत. येणाऱ्या शिवभक्तांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी समिती कार्यरत आहे. गडाच्या पायथ्याला वाहनतळ, मोफत शटल बससेवा, अन्नछत्र उभारण्यात आले आहे.

स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून कार्यरत

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून तर माघार घेतली आहे. मात्र स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत राहणार आहेत. याद्वारे जनतेशी संवाद साधून त्याप्रमाणे पुढील वाटचाल करणार आहेत. नुकतेच संभाजीराजेंनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नतमस्तक होत तुमच्या नजरेतले स्वराज्य घडवायचे आहे, अशी पोस्ट केली होती. तर कार्यकर्त्यांशीदेखील संवाद साधला होता.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा