युती, आघाडीत भांड्याला भांडं लागायला नको असेल तर 150 जागा निवडून आणा; संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या कुरबुरी सुरू असून त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. (shivsena leader sanjay raut address in pune sabha)

युती, आघाडीत भांड्याला भांडं लागायला नको असेल तर 150 जागा निवडून आणा; संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन
sanjay raut

पुणे: स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या कुरबुरी सुरू असून त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. युती आणि आघाडीत भांड्याला भांडं लागतच असतं. जर भांड्याला भांडं लागायला नको असं वाटत असेल तर 150 जागा निवडून आणा, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं. (shivsena leader sanjay raut address in pune sabha)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील एका सभेत हे आवाहन केलं. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी स्थानिक पातळीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर राऊत यांनी भाष्य केलं. इतरांसारखं शिवसेना कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. विजय शिवतारे आम्ही तुमच्या मागे आहोत. युती होईल, महाविकास आघाडी होईल. सन्मानाने जागा वाटप झालं तर आपण एकत्र लढू, असं सांगतानाच युती, महाविकास आघाडीमध्ये भांड्याला भांड लागणार. हे नको असेल तर 150 जागा निवडून आणा. जो पर्यंत ते होत नाही तोपर्यंत गोड मानून घ्या, असं राऊत म्हणाले.

शिवसेना आग आहे

शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, शिवसेना ही आग आहे. एकच सांगतो. उद्धव ठाकरे देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले आहेत. तसा पक्षही पहिल्या क्रमांकाचा व्हावा, ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना संघटनेत स्थान द्या. कोणतंही पद न स्वीकारता बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधीश होते. मंत्री, आमदार, खासदार हे काही महत्त्वाचं नाही. पण पक्ष महत्त्वाचा आहे. मंत्रीपद येते आणि जाते. पण मग मला माजी म्हणू नका असं म्हणतात. आम्हाला कुणी माजी म्हणणार नाही, असं ते म्हणाले.

अजितदादांना भेटा

उपमुख्य मंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. पहाटेची घटना विसरली आहेत. तुम्हीही विसरून जा. साखर झोपेतील घटना विसरा. अजितदादांना भेटा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. अजितदादा आपली कामं करतील, असं त्यांनी सांगितलं.

एकही केस हरत नाही

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. चंद्रकांत दादा म्हणाले माजी म्हणून नका. मी नाही म्हणणार. कारण आमची मैत्री आहे. त्या मैत्री मुळेच मी सव्वा रुपयांचा दावा लावला आहे. चंद्रकांत दादा म्हणतात तुमची किंमत एवढी कमी कशी? खरंतर ही माझी किंमत नाही. ती तुमची किंमत आहे. मला नकोय तुमचे शंभर कोटी. सव्वा रुपया पुरेसा आहे. एक सांगतो, चंद्रकांतदादांना सव्वा रुपया द्यावाच लागणार आहे. मीही सव्वा रुपया घेतल्याशिवाय राहणार नाही. मी कोणतीही केस हारत नाही. हरलो नाही. दोन वर्षापूर्वीच एक केस जिंकली. मुख्यमंत्री आमचा झाला, असा टोलाही त्यांनी लगावला. (shivsena leader sanjay raut address in pune sabha)

 

संबंधित बातम्या:

वर सत्तेत एकत्र असलो तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही; विजय शिवतारेंची जाहीर कबुली

महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, भाजपच्या केंद्रीय नेत्याचं मोठं विधान

यूपीएससी परीक्षेत बार्टीचा झेंडा, 9 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या खास शुभेच्छा

(shivsena leader sanjay raut address in pune sabha)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI