विनापरवाना वृक्षतोड केल्यास आता 50 हजार रुपयांचा दंड

Tree cutting | विनापरवाना वृक्षतोडीचे छायाचित्र, व्हिडीओसह माहिती देणाऱ्यालाही बक्षीस दिले जाणार आहे. यापूर्वी विनापरवाना वृक्ष तोडल्यास केवळ 10 हजार रुपये दंड आकारला जात होता.

विनापरवाना वृक्षतोड केल्यास आता 50 हजार रुपयांचा दंड
वृक्षतोड
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 10:36 AM

पिंपरी-चिंचवड: विनापरवाना वृक्षतोड केल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये आता 50 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. प्राधिकरण समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. शहरात होणाऱ्या अमाप वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. (Strict action against illegal tree cutting in Pune)

विनापरवाना वृक्षतोडीचे छायाचित्र, व्हिडीओसह माहिती देणाऱ्यालाही बक्षीस दिले जाणार आहे. यापूर्वी विनापरवाना वृक्ष तोडल्यास केवळ 10 हजार रुपये दंड आकारला जात होता. मात्र, आता दंडाची रक्कम थेट 50 हजार झाल्याने बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

वरळी शिवडी उन्नत मार्गात झाडांचा अडथळा, 452 झाडांची कत्तल

मुंबईचा विकास म्हटलं की झाडांचा बळी हे नेहमीचं समीकरण बनलं आहे. विविध प्रकल्पांच्या नावाखाली वर्षानुवर्षे जुन्या झाडांची कत्तल केली जात आहे. नुकतंच वरळी शिवडी उन्नत मार्गात 452 झाडे बाधित होत आहेत. मात्र अनेक वृक्षप्रेमी संघटनांनी या वृक्षतोडीला विरोध केला आहे. त्यामुळे येत्या काळात हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

शिवडी येथून वरळीकडे थेट वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम हाती घेण्यात आले. हा प्रकल्प मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील वांद्रे-वरळी सागरी सेतू तसेच प्रस्तावित कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. एमएमआरडीएकडून हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाद्वारे वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मात्र या प्रकल्पासाठी 452 झाडांची कत्तल केली जाणार आहे. नुकतंच शिवडीपासून वरळीपर्यंत अनेक झाडांना पालिकेने नोटिसा चिटकवल्या आहेत. येत्या काही दिवसात ही झाडं तोडली जाणार आहेत. या वृक्षतोडीला अनेक वृक्षप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे.

संबंधित बातम्या:

वरळी शिवडी उन्नत मार्गात झाडांचा अडथळा, 452 झाडांची कत्तल, वृक्षप्रेमी संघटनांकडून विरोध

इंटर मॉडेल स्टेशनसाठी तब्बल 40 हजार झाडांची कत्तल, नागपुरात वृक्षप्रेमींचा कडाडून विरोध

(Strict action against illegal tree cutting in Pune)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.