सुनेत्रा पवार पोहोचल्या काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांची त्यांच्या राहत्या घरी जावून भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अंनतराव थोपटे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

सुनेत्रा पवार पोहोचल्या काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 9:21 PM

पुणे | 1 मार्च 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यादरम्यान आज काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांची राहत्या घरी जावून भेट घेतली. त्यांच्या भेटीवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली तेव्हा संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरुपा थोपटे आणि पुत्र पृथ्वीराज थोपटे हे देखील उपस्थित होते. तर संग्राम थोपटे विधानसभेच्या अधिवेशनामुळे सध्या मुंबईत आहेत. दरम्यान, या भेटीवेळी सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. थोपटे कुटुंबीय आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

अनंतराव थोपटे हे 6 वेळा काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. तर त्यांचे पुत्र आणि भोर विधानसभा मतदारसंघांचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे सलग 3 वेळा काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. थोपटे घराणं पहिल्यापासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहीलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेमध्ये येणाऱ्या भोर, वेल्हा, मुळशी या तीनही तालुक्यात थोपटे यांचं गेली अनेक दशकं वर्चस्व आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यांचा पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतांचं गणित जुळवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी थोपटे कुटुंबियांची भेट घेतली तर नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. तसेच या भेटीमागे आणखी काही राजकीय कारण आहे का? अशा देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....