AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे राठी हत्याकांडातील फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीची 28 वर्षानंतर कशी झाली मुक्तता?

पुणे शहरातील हत्याकांड प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने सोडले. त्या आरोपीने केलेल्या एका दाव्यानंतर त्याची कारागृहातून मुक्तता झाली. तो तब्बल 28 वर्षांपासून कारागृहात होता. तीन वर्ष त्या आरोपीच्या दाव्याचा तपास सुरु होता.

पुणे राठी हत्याकांडातील फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीची 28 वर्षानंतर कशी झाली मुक्तता?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2023 | 6:12 PM
Share

पुणे : पुणे शहराला नाही तर देशात गाजलेल्या राठी हत्याकांड प्रकरणात वेगळाच निर्णय आला आहे. 1994 मधील या राठी हत्‍याकांडातील प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीची शिक्षा जन्मठेपेत केली गेली. त्यानंतर त्याने केलेल्या एका दाव्यानंतर आता त्याला कारागृहातून बाहेर काढण्यात आले. 28 वर्षांपासून कारागृहात असलेल्या आरोपीला का सोडले गेले? कोणत्या दाव्यामुळे त्याला सोडण्यात आले? पाहूया नेमके काय घडेल. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता.

काय आहे प्रकार

पुणे शहरातील पौड रस्त्यावरील शिला विहार कॉलनीत 1994 मध्ये भरदिवसा सात जणांची हत्या झाली होती. मिठाईच्या दुकानात पगारवाढ न केल्यामुळे दुकानाचे मालक केसरीमल राठी यांच्या अपहरणाचा कट आरोपींनी रचला. परंतु त्याचा हा डाव फसल्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्वांची निर्घृण हत्या केली. त्यात केसरीमल राठी यांच्या पत्नी मीराबाई (वय ५०), मुली प्रीती (वय २१), हेमलता नावंदर (वय २४), सून नीता (वय २५), नातू प्रतीक (वय दीड वर्ष), चिराग (वय ४) आणि मोलकरीण सत्यभामा सुतार (वय ४५) यांचा समावेश होता.

कोण आहेत आरोपी

राठी हत्याकांड प्रकरणात राजू राजपुरोहित , जितू नैनसिंग गेहलोत, नारायण चेताराम चौधरी ( सर्व रा. राजस्थान ) हे आरोपी होते. पोलिसांच्या तपासात ते स्पष्ट झाले. यातील राजपुरोहित माफीचा साक्षीदार बनला. त्यामुळे त्याची गुन्ह्यातून मुक्तता झाली. परंतु अन्य दोघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. मग त्यांनी राष्ट्रपतींकडे दयाचा अर्ज दाखल केला. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरीत करण्यात आली.

आता कोणाची झाली मुक्तता

हा खटला सुरु असताना नारायण चेताराम चौधरी या आरोपीचे वय 20 ते 22 असल्याचे नोंदवण्यात आले होते. नारायण चौधरी याने आपला दयेचा अर्ज मागे घेत नवा दावा केला. त्याने गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन होतो, असं सांगत एक पुनर्विचार याचिका दाखल केली.

तीन वर्षांपूर्वी चौकशीचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी सत्र न्यायालयाला चौधरी याच्या दाव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने त्यांच्या शाळेतील जन्‍मनोंदीचा पुरावे तपासले. त्यानंतर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, के.एम जोसेफ आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने नारायण चौधरी याचा खुनाच्‍या गुन्‍ह्याच्या वेळी अल्‍पवयीन असल्‍याचा दावा मान्य करून त्याची कारागृहात तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...