सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतीवरील सुनावणीस सुरुवात; बैलगाडा मालकांच्या आशा वाढल्या

तामिळनाडू व कर्नाटक या राज्यात बैलगाडा शर्यती सुरु आहेत. मात्र महाराष्ट्रात बैलगाडा शैर्यतीवर बंदी आहे. २०१६ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना काढत काही नियम व अटींच्या अधीन राहून शर्यतींवरील बंदी उठवली होती. मात्र बंदीला प्राणीप्रेमी स संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले  .

सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतीवरील सुनावणीस सुरुवात; बैलगाडा मालकांच्या आशा वाढल्या
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातल्या तीन याचिकांवर आज सुनावणी

पुणे- ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या सुनावणीस आजपासून सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज २० मिनिटांची सुनावणी झाली. यामुळे बैलगाडा चालक- मालकांमध्ये आशा निर्माण झाल्या आहेत. राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकारी वकिलांना सुनावणी होण्यासाठी न्यायालयात विनंती अर्ज कराण्यांच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार १५ नोव्हेंबरलाच सुनावणी होणार होती. मात्र सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आज सकाळी ही बैलगाडा शर्यतीच्या सुनावणी पार पडली.

तामिळनाडू व कर्नाटक या राज्यात बैलगाडा शर्यती सुरु आहेत. मात्र महाराष्ट्रात बैलगाडा शैर्यतीवर बंदी आहे. २०१६ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना काढत काही नियम व अटींच्या अधीन राहून शर्यतींवरील बंदी उठवली होती. मात्र बंदीला प्राणीप्रेमी स संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले  .

बंदी झुगारून पारपडल्या शर्यती

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही बंदी झुगारत सांगलीत बैलगाडा शर्यती पार पडल्या होत्या. गनिमा कावा पद्धतीने पारपडलेल्या या शर्यतीमध्ये पोलिसांनी शर्यत न होऊ देण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मात्र  त्याला न जुमानता चकवा देता गोपीचंद पाडळकरांनी या शर्यती पार पडून दाखवल्या होत्या.

त्यानंतर राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातही या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या वेळी कुणालाही थांगपत्ता न लावता या शर्यती घेण्यात आल्या होत्या. बैलगाडा शर्यती बंद झाल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे लवकरत लविकार ही शर्यत सुरु करावी अशी मागणी बैलगाडा मालक , तसेच शर्यतप्रेमींकडून होत आहे.

उर्वरित सुनावणी पुढील आठवड्यात

आज झालेल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र्राच्या वतीने ज्येष्ठ वकिलांनी युक्तीवाद केला. यामध्ये देशाच्या इतर राज्यांमध्ये बैलगाडा शर्यती सुरु आहेत. मग महाष्ट्रातच यावर बंदी का, महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यतींनबा परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावरील उर्वरित सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.

घड्याळ वापरताना काही नियम लक्षात ठेवा, नाहीतर अडथळ्यांमध्ये वाढ नक्की

Kishori pednekar : लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, मुंबई महापालिका सज्ज असल्याचा महापौरांचा दावा

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात

Published On - 5:18 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI