AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushma Andhare : जे जाणते असतात तेच नेते होतात, दसरा मेळाव्यावरून सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका

जेव्हा आपले कार्यकर्ते प्राणपणाने लढतात, आपल्या एका इशाऱ्यावर प्रसंगी मरायला, मारायला तयार होतात, तेव्हा आपल्या त्या कार्यकर्त्यांना विधायक दिशेने नेण्याची जबाबदारी ही नेत्याची असते. कारण जे जाणते असतात, ते नेते होतात, असा टोला सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

Sushma Andhare : जे जाणते असतात तेच नेते होतात, दसरा मेळाव्यावरून सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका
राज ठाकरेंवर टीका करताना सुषमा अंधारेImage Credit source: tv9
| Updated on: Aug 30, 2022 | 2:01 PM
Share

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) हे भाजपाचा अजेंडा चालवत आहेत. बाळासाहेबांनी निर्माण केलेली प्रादेशिक अस्मिता आणि त्यांचा पक्ष संपवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर मनसेने टीका केली होती. वारसा हा वास्तूचा नसून विचारांचा असतो, असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्याला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्या शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सामना पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही. शिंदे गटही मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होत आहे. अशावेळी इतर पक्षही शिवसेनेवर हल्लाबोल चढवित आहेत.

‘राज ठाकरे यांनी भाजपाचे कंत्राट घेतले’

सुषमा अंधारे म्हणाल्या, की राज ठाकरे यांनी भाजपाचे कंत्राट घेतले आहे. राजकीय पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आपल्या नेत्याबद्दल आपुलकी वाटणे साहजिक आहे. यात आक्षेप वाटण्यासारखे काहीच नाही. पण ज्यावेळी एखादा कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी लढतो, झटतो, त्यावेळी त्या कार्यकर्त्याला विधायक मार्गाने नेण्याची जबाबदारी ही त्या नेत्याची असते. राज ठाकरे यांनी स्वतःला प्रश्न विचारावा, की मी खरोखरच बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवत आहे का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना केला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

‘जे जाणते असतात, ते नेते होतात’

जेव्हा आपले कार्यकर्ते प्राणपणाने लढतात, आपल्या एका इशाऱ्यावर प्रसंगी मरायला, मारायला तयार होतात, तेव्हा आपल्या त्या कार्यकर्त्यांना विधायक दिशेने नेण्याची जबाबदारी ही नेत्याची असते. कारण जे जाणते असतात, ते नेते होतात, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

मनसेची शिवसेनेवर काय टीका होती?

‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो” असे ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.