AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सगळंच संशयास्पद…’, वैष्णवी हगवणे प्रकरणात सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप

वैष्णवी हगवणे प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत, सगळंच संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

'सगळंच संशयास्पद...', वैष्णवी हगवणे प्रकरणात सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 27, 2025 | 7:59 PM
Share

पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे, वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तिचा पती, सासू, सासरा, नंदण आणि दिराला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी पाच जणांना देखील अटक करण्यात आली आहे, वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला मदत केलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केलं आहे.  या प्रकरावर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हणाल्या अंधारे? 

वैष्णवी हगवणेच्या शरीरावर तब्बल 19 जखमा होत्या,  सर्व जखमा तिच्या मृत्यूच्या दिवशीच्या होत्या, तिचा मृत्यूच मुळात संशयास्पद आहे. पोलिसांनी तिच्या मृत्यूची नोंद संशयास्पद मृत्यू अशी करणे अपेक्षित होतं. परंतु त्यांनी त्याला आत्महत्या असं नाव दिलं, त्यामुळे एकूणच पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निलेश चव्हाण वरती यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत, पुणे ग्रामीण पोलिसांनी निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना नाकारला होता, मात्र जालिंदर सुपेकर यांच्या शिफारसीने त्याला शस्त्र परवाना मिळाला. बड्या लोकांचा, राजकीय लोकांचा आणि पोलिसांचा वरदहस्त आहे. मयुरी हगवणेची तक्रार न घेता करिष्मा हगवणेची तक्रार महिला आयोगानं घ्यावी, हे सर्व अतिशय गुंतागुंतीचं  आणि संशयास्पद आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

आणखी पाच जणांना अटक 

वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी आधी तिचा पती, सासू, सासरा, दीर आणि नणंद यांना अटक केली, दरम्यान वैष्णवीचा सासरा फरार असताना त्याला ज्यांनी-ज्यांनी मदत केली त्यांना देखील आता पोलिसांनी अटक केली आहे, यामध्ये पाच जणांचा समावेश आहे. या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे, वैष्णवीने 16 मे रोजी आत्महत्या केली होती, सासरच्या छळाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत आहेत.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?