Eknath Shinde : शिवसैनिकांचा संयम आता सुटला; तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची पुण्यातल्या बालाजीनगरात तोडफोड

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला गेले. त्यानंतर आता राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी बालाजीनगर परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे.

Eknath Shinde : शिवसैनिकांचा संयम आता सुटला; तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची पुण्यातल्या बालाजीनगरात तोडफोड
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 12:37 PM

पुणे : तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला गेले. त्यानंतर आता राज्यभरातील शिवसैनिक (Shivsainik) आक्रमक झाले आहेत. त्यांनी बालाजीनगर परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. शिवसैनिक त्याठिकाणी पोहोचले त्यावेळी पोलीस घटनास्थळी नव्हते. हाताच शिवसेनेचा झेंडा घेऊन यावेळी कार्यालयाची तोडफोड (Vandalized) करण्यात आली. गद्दार असे कार्यालयाच्या काचांवर लिहून या काचा फोडण्यात आल्या आहेत. शिवसैनिकांनी यावेळी तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी बंडखोरांना इशारा देताना शिवसैनिक आक्रमक झाले तर उद्रेक होईल, आग लागेल असे म्हटले होते. त्याच्या काही वेळातच शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

‘… तर त्या सर्वांची अशीच अवस्था होईल’

जो शिवसेनेशी गद्दारी करेल, त्याला असेच उत्तर मिळणार. बंड करणाऱ्यांना अजूनही वेळ आहे. त्यांनी परत यावे, अन्यथा त्या सर्वांची अशीच अवस्था होईल, असे आक्रमक शिवसैनिक म्हणाले आहेत. सत्ता असताना शिवसेनेत आहे. तो काही मूळ शिवसैनिक नाही, अशी तानाजी सावंत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. हाच कळीचा नारद आहे, त्यामुळे सुरुवात आता पुण्यातून झाली आहे. ते लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल. त्यामुळे वेळीच परत या, असे आक्रमक शिवसैनिक म्हणाले.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांनी दिला होता इशारा

बंडखोरी केलेल्या आमदारांनी अजूनही लक्षात ठेवावे. वेळ गेलेली नाही. शिवसैनिक शांत आहे. तो एकदा का आक्रमक झाला, तर आग लागेल, उद्रेक होईल. माझ्याकडे सांगलीचे शिवसैनिक आले होते. ते विचारत होते आम्ही काय करावे? आता हे लोक भडकले तर काय होईल, आग लागेल, असे वक्तव्य सकाळीच संजय राऊत यांनी केले होते. त्याच्या काही वेळातच शिवसैनिकांनी पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातला. तर तिकडे अंबादास दानवे यांनीही इशारा दिला आहे. शिवसैनिक आक्रमक नाही तर काय होणार, असा संताप व्यक्त करत बंडखोरांना परत येण्याचे आवाहन केले आहे. सुरुवात आता पुण्यातून झाली आहे. ते लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल. त्यामुळे वेळीच परत या, असे आक्रमक शिवसैनिक म्हणाले.

पाहा व्हिडिओ –

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.