Pune Mahatma Phule Wada : पुण्यातल्या महात्मा फुले वाड्याच्या कमानीवरचा ‘तो’ वादग्रस्त फलक अखेर काढला

या फलकावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत तो काढला आहे. नगरसेविकेची मुदत संपल्यानंतर हा फलक लावण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हा फलक काढला आहे.

Pune Mahatma Phule Wada : पुण्यातल्या महात्मा फुले वाड्याच्या कमानीवरचा 'तो' वादग्रस्त फलक अखेर काढला
महात्मा फुले वाड्यासमोर आंदोलन करताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्तेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 1:09 PM

पुणे : महात्मा फुले वाड्याच्या (Mahatma Phule Wada) कमानीवरील वादग्रस्त फलक समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हटवला आहे. माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावे हा फलक लावण्यात आला होता. फुले वाड्याच्या स्वागत कमानीवर लावण्यात आलेल्या या फलकामुळे वाद निर्माण झाला होता. या फलकासंदर्भात अनेक सामाजिक संस्थांनी आक्षेप नोंदवला होता. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत हा फलक हटवला आहे. कै. लक्ष्मीबाई नारायण हरीहर असा हा फलक (Board) लावण्यात आला होता. विजयालक्ष्मी हरीहर असे माजी नगरसेविकेचे नाव आहे. कमानीवर नाव लावण्याचा विषय आम्ही नाव समितीत मंजूर करून घेतल्याचा दावा हरीहर कुटुंबाने केला होता. तर महात्मा फुले मंडळ, ज्योती मित्र मंडळ आणि अखिल माळी प्रबोधन समितीने यावर आक्षेप घेतला होता. यासंबंधी महापालिका आयुक्तांकडे (PMC Commissioner) तक्रारही करण्यात आली होती.

काय आहे वाद?

24 मे रोजी आता ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजपाच्या माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हरीहर यांच्या सासू ‘कै. लक्ष्मीबाई नारायणराव हरिहर’ यांच्या नावाचा फलक लावण्यात आला. त्याखाली मार्गदर्शक म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांचे नाव दिसते. तर संकल्पना म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव आहे. त्याखाली विजयालक्ष्मी हरिहर, सम्राट थोरात, आरती कोंढरे व अजय खेडेकर या चार माजी नगरसेवकांची नावे आहेत.

हे सुद्धा वाचा

फलक हटवताना महिला कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

समता परिषद आक्रमक

या फलकावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत तो काढला आहे. नगरसेविकेची मुदत संपल्यानंतर हा फलक लावण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हा फलक काढला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विजय असो अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. निषेध असो निषेध असो, राष्ट्रीय स्मारकाला धक्का लावणाऱ्यांचा निषेध असो, अशा घोषणा महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, महापालिका यावर आता काय कारवाई करणार ते पाहावे लागणार आहे. कारण आयुक्तांकडे आधीच यासंबंधी तक्रार विविध संघटनांमार्फत करण्यात आली होती. महापालिकेने तो काढण्याऐवजी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तो फलक काढला आहे. तर संबंधित नगरसेविकेची यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.